प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची बैठक विश्राम गृह येथे संपन्न.
उमरखेड येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची बैठक संपन्न.
नवीन पत्रकाराचा कार्यकारणीमध्ये प्रवेश.
उमरखेड…
राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मासिक बैठक उमरखेड येथे विश्राम गृहात शुक्रवारी पार पडली.
यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या सर्कल मधील संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी हजेरी लावली होती. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांच्या उपस्थिती मध्ये तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे यांनी पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्य्क्ष अनिल राठोड यांनी संघटनेच्या कुठल्याही व्यक्तीवर जर अन्याय झाला तर कदापि खपवून घेणार नाही. कुठल्याही प्रकारे अन्याय सहन करणार नाही. व पत्रकारांच्या मागे आपली संघटना सदैव उभी असेल असे आश्वासन दिले. संघटनेची दरमहा बैठक होत असते व त्या मध्ये पत्रकारांच्या समस्या सोडवल्या जातात. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगाव हे सुद्धा नियमित पणे संघटनेच्या संपर्कात राहून योग्य ते मार्गदर्शन करत राहतात. या बैठकी मध्ये काही नवीन पत्रकारांना संघटने मध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अनिल राठोड, राज्य उपाध्यक्ष महिला अध्यक्ष्या सविता चंद्रे, यवतमाळ युवा अध्यक्ष उदय पुंडे, जिल्हा युवा उपाध्यक्ष मोहन कळमकर, कार्याध्यक्ष गजानन गंजेवाड,तालुका अध्यक्ष मारोती गव्हाळे, उपाध्यक्ष सुनील ठाकरे,संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक हरिदास इंगोलकर सर,भागवत काळे,कमलाकर दुलेवाड सर,, मैनुदिन सौदागर, गजानन वानखेडे,संजय जाधव, संदेश कांबळे, गजानन नावडे, मारोतराव रावते, कय्युम नवाब,प्रेमकुमार भारती, पंकज गोरे, वसंता नरवाडे,बाजीराव रावते,व इतर सर्व संघटनेचे आदी पदाधिकारी व सदस्य बांधव उपस्थित होते.