दिल्ली येथे बंजारा महाअधिवेशनात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा ‘ : प्रा . कैलास राठोड

youtube

दिल्ली येथे बंजारा महाअधिवेशनात लाखोच्या संख्येने सहभागी व्हा ‘ : प्रा . कैलास राठोड

एक दन समाजे सारु 

उमरखेड शहर प्रतिनिधी :

दि 22 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथे बंजारा महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे गहूली ते दिल्ली तांडो लदेणी अशी महायात्रा ,कर्मभूमी ते राजभूमी तक , या उक्तीप्रमाणे महाअधिवेशनात लाखोच्या संख्येने बंजारा समाजाने सहभागी राहण्यासाठी हिंगोली लोकसभा सामाजिक कार्यकर्ते प्रा कैलास राठोड यांनी समाज बांधवाला उपस्थित राहण्यासाठी आवाहान केले आहे .
निसर्ग पूजक , वैशवीक बंधुभाव जोपासणारा , जगात सर्वात सुंदर संस्कृती असलेला बंजारा समाज हा जगभर पसरलेला आहे .एकच भाषा , वेशभूषा , तांडा – पंचायत व एकच रूढी परंपरा असलेला बंजारा समाज हा भारत देशात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो .
बंजारा समाज आंतरराज्यात खानपान , रोटीबेटी व्यवहार एक असतानाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात मोडतो , जसे तेलंगणा व आंध्रप्रदेशांमध्ये बंजारा एसटी प्रवर्गामध्ये आहे , कर्नाटकामध्ये एससी प्रवर्गामध्ये आहे तर महाराष्ट्रात व्हीजेएनटी प्रवर्गामध्ये मोडतो .
आंध्रप्रदेश , कर्नाटक मधील आरक्षण हे संविधानिक आहे तर महाराष्ट्र , गुजरात उत्तरप्रदेश अशा 14 राज्यांमध्ये बंजारा समाजांना संविधानिक आरक्षण नाही .
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक यांनी बंजारा समाजाच्या प्रगतीसाठी भरपूर प्रयत्न केले. बंजारा समाजाची काशी पोहरादेवीचे महान तपस्वी संत रामराव महाराज सेवाभाया यांनी बंजारा समाजाला संविधानिक आरक्षण मिळावे यासाठी अनेक वेळा दिल्ली गाठली ,परंतु त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले .महान योद्धा बाबा लकीशहा बंजारा यांचा देशाची राजधानी दिल्ली निर्माण करण्यात सिंहाचा वाटा होता .
संसद भवनाची हजारो एकर जमीन त्यांचेच योगदान आहे . .इंग्रजाच्या काळात बंजारा समाज हा व्यापार व दळणवळण करणारा व्यापारी समाज म्हणून प्रसिद्ध होता . संपूर्ण व्यापार हा जंगलातून व खूपिया मार्गाने करत असे .एकूण एकंदरीत बंजारा समाजाचा सारखाच इतिहास असून या समाजाला आजही महाराष्ट्र आंध्र कर्नाटक इतर राज्य प्रमाणे आरक्षण दिले गेले नाही .यासाठी सर्व बंजारा बांधवांनी दिनांक 3 डिसेंबरला बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येथे जगदंबा देवी मंदिर व संत सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी एकत्र यावे व दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी गहूली तालुका पुसद येथे लाखोच्या संख्येने बंजारा समाजाचा जमाव होणार असून येथून महायात्रेला सुरुवात होणार आहे .
या महाधिवेशनाचे आयोजन सर्वच राज्यातील कर्मचारी समाज बांधव, सामाजिक संघटना , शैक्षणिक संस्था व समाजसेवक करणार आहेत .आम्ही तर सर्वजण येत आहोत आपणही ‘एक दन समाजेसारु’ असे समजून या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार व्हावे व आपल्या भावी पिढीला न्याय मिळवून द्यावा असे आवाहान सामाजिक कार्यकर्ते प्रा कैलास राठोड यांनी समाज बांधवांना केले आहे .
सदर महायात्रा महाराष्ट्र ,मध्यप्रदेश , गुजरात राजस्थान ,उत्तरप्रदेश मार्गक्रमन करत ही महायात्रा 22 डिसेंबर2023 ला रामलीला मैदान दिल्ली येथे पोहोचणार आहे .

चौकट “

दिल्ली येथे होणाऱ्या महाअधिवेशनात मूळ संविधानिक आरक्षणाला धक्का न लागता बंजारा समाजाला स्वतंत्र संविधानिक आरक्षणाची मागणी करण्यात येणार आहे व बंजारा भाषेला राजभाषेचा दर्जा देणे , बंजारा समाजाची स्वातंत्र जनगणना करणे व लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणामध्ये हिस्सा देणे या प्रमुख मागण्या केले जाणार आहेत .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!