उमरखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उपसमिती कडून मंजूर.
उमरखेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय उपसमिती कडून मंजूर
दि.-उमरखेड
येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्याच्या अनुषंगाने वकील संघ आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीनजी भुतडा यांचे माध्यमातून सातत्याने मंत्रालयीन स्तरावर प्रयत्नरत होते त्या पाठपुराव्याला यश आले आहे .कारण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू करण्याचे उपसमितीकडून मंजूर करण्यात आले आहे.या उप समितीमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव व विधी व न्याय विभागाचे सचिव अशी त्रि सदस्य समिती कार्यरत असते सदर समिती कडून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर करण्यात आले आहे यासाठी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री नितीन जी भुतडा यांनी मंत्रालय स्तरावरून महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि काही दिवसांपूर्वीच वकिलांच्या शिष्टमंडळासोबत आमदार ससाने साहेब यांनी भेट घेऊन त्यावर चर्चा केली होती.त्याचीच फलश्रुती म्हणून उपसमितीकडून उच्च सचिव स्तरीय समिती व मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेऊन लवकरच अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय बाबत शासन निर्णय जाहीर होणार आहे बऱ्याच दिवसापासून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मंजुरी मिळण्याकरिता पाठपुरावा केल्या जात होता सदर मंजुरीमुळे पाठपुराव्याला यश आल्यामुळे सर्वच स्तरावरून समाधान व्यक्त केले जात आहे