शाळकरी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार या घटनेतील अजिस खान ला पोलीसां कडुन अटक ; पळशी ( नविन ) बस थांब्यावरील घटना  सराईत गुन्हेगार यांच्या शिरावर अनेक गुन्हे.

youtube

शाळकरी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार या घटनेतील अजिस खान ला पोलीसां कडुन अटक ; पळशी ( नविन ) बस थांब्यावरील घटना
सराईत गुन्हेगार यांच्या शिरावर अनेक गुन्हे

ऑक्टोंबर
उमरखेड
१० ऑक्टोंबर मंगळवारी रोजी नेहमी प्रमाणे शाळेला जान्या साठी ११ वर्षीय चिमुरडी पळशी ( नविन ) या बस थांब्यावर सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उमरखेड शहरी येथील खाजगी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत बसली असतांना या फायदा उचलत आरोपी यांने भावनिक बतावणी करून स्वतः कडिल मोटर सायकल वर बसवून पुढे बेलखेड शिवारात नेऊन तीच्यावर बळजबरी लैंगिक अत्याचार केला आणि त्या ठिकाना वरुन शहरात दुचाकीवर आनुन सोडले अन्याय ग्रस्त अपहत मुलगी रडत होती या बदल नागरिकांनी धावा घेतला असता तीला खासगी शाळेत पोहोचविले तेव्हा चिमुकली ने आपबीती कथन केली त्या वरुन पोफाळी ठाणेदार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी चा शोध सुरु केला होता त्या अगोदर त्या मुलीचे बयान नोंदवून गुन्हा दाखल केला होता
मंगळवार पासुन आरोपी ला शोधन्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधिक्षक विनय कोते , एस डि पी ओ प्रदिप पाडवी , पोफाळी ठाणेदार दिपक ढोमणे पाटिल यांच्या सह उमरखेड ठाणेदार शंकर पांचाळ आणि या घटनेत नेमनुक केलेले पाच पथक कर्मचारी यांनी या घटनेतील आरोपीचा छडा लावला गुन्ह्याच्या अनुषगांने चौभेर तपासात सी सी टि व्ही फुटेज तांत्रिक मदत व नागरिक यांच्या मदतीतून शहरा नजीक नागापुर ( रुपाळा ) येथे वास्तव्याला असलेल्या आरोपी अजिज खा मोहमद खॉ पठाण ( ४९ ) याला पोक्सो अंतर्गंत लैंगिक अत्याचार प्रकरणी या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे
आरोपी अजिज खा मोहमद खाँ पठाण ( ४९ ) यांनी अनेक महिलावर लैंगिक अत्याचार करुन त्यांना ठार मारले या घटनेचे गुन्हे मराठवाडा – विदर्भातील पोठीस ठाण्यामध्ये नोंद असुन तो सराईत गुन्हेगार आहे नुकताच विविध गुन्ह्यात ठोठवल्यालेल्या गुन्ह्यात कारागृरामध्ये शिक्षा भोगत असतांना पॅरारवर नातेवाईक भेटी ला नुकताच गांवी आला असतांना आरोपी अजिज ने हि घटवून आनली आहे या गुन्ह्यात पोफाळी ठाणेदार दिपक ढोमणे पाटिल तपास करित असुन आरोपी कडुन गुन्ह्यांच्या संदर्भाने अधिक तयास करण्यासाठी येथील न्यायालयात उपस्थित करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिक माहिती देतांना सांगीतले आहे

कोट –
शाळेला जान्या साठी पळशी बस थांब्यावर बसलेल्या मुलीला बतावणी करुन हैवानी प्रवृतीच्या आरोपी ने त्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून जनसामान्यांचे मनसुन्न् करनारी घटना केली , त्या आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या साठी ‘ जन आंदोलन आधार संघर्ष समिती ‘ च्या वतीने उद्या १३ ऑक्टोंबर शुक्रवारी रोजी स्थानिक संजय गांधी चौकात सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे , असे सर्व समाज माध्यमांवर व पत्रकार यांना माहिती देऊन सामाजिक संघटनांच्या नागरिकांनी या घटने प्रकरणी एकवटून सामील होण्याचे अवाहन समिति संस्थापक अध्यक्ष जगदिश नरवाडे यांनी केले आहे ..

पत्रकार परिषद ।
लैंगिक अत्याचार प्रकरणी पकडण्यात आलेल्या आरोपी अजिज खा मोहमद खाँ पठाण रा रुपाळा ( नागापुर ) आरोपीवर खुनाचे १० गुन्हे ईतर मोठे १२ गुन्हे नांदेड – यवतमाळ जिल्हा सह शिरावर आहेत ईतर गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना तालुका गांवी २७ सप्टेंबर रोजी जमानतावर आला होता त्या नंतर हा गुन्हा घडवून आनला पोलीस प्रशासन यांच्या कडुन हा खटला जलद गती न्यायालयात वेगळे असे सरकारी अभियक्ता नेमनुक मागवून आरोपीला लवकर जमानत न मिळन्या साठी प्रयत्न असनार आहेत
– डॉ पवण बनसोड
जिल्हा पोलीस अधीक्षक

कोट –
उमरखेड शाळा परिसरात आम्ली पदार्थ रात्रीच्या वेळी शाळकरी मुले व काही तरुण मुलं सेवनाच्या आहारी जात आहे पोलीस प्रशासना कडुन या प्रकाराला आळा बसविन्या साठी छापे मारावेत जेने करून युवकां मधील व्यसनाधिन पणा कमी होईल तसेच गुन्हेगारी वर आळा बसेल असे पत्र परिषद मध्ये हा मुद्या माजी आमदार राजेंन्द्र नरजरधने यांनी या वेळी उपस्थित करण्यात आला यावेळी पक्ष व सामाजिक संघटनेच्या जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हा अध्यक्षा सरोज देशमुख , दता गंगाधर , यांच्या सह अन्य उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!