सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी सेवानिवृत्त शिक्षकांचे उपोषण.

youtube

सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी साठी सेवानिवृत्त शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

उमरखेड /तालुका प्रतिनिधी

सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची थकबाकी त्वरित देण्यात यावी यासह इतर मागण्या संदर्भात सेवानिवृत्त शिक्षकांनी आज 27 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मागण्या त्वरित मान्य न झाल्यास यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
देशाचे भविष्य घडविण्याचे कार्य ज्यांच्या हातात आहे अशा शिक्षकांनी ३५ वर्ष सेवा दिल्यानंतर सुध्दा आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषण करावे लागत असून शासनाने मंजूर केलेल्या सातव्या वेतन आयोगातील २०१९ मध्ये मंजुर असलेल्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची थकबाकी त्वरित देण्यात यावी, रजा रोखीकरण ची रक्कम तात्काळ देण्यात यावी, अंशराशीकरण ची रक्कम मिळण्यात यावी . तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा पगार दरमहा एक तारखेला करण्यात यावा या मागणीसाठी आज पंचायत समिती कार्यालयासमोर सेवानिवृत्त शिक्षकांनी उपोषण केले. ज्या मागण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक उपोषणाला बसले ते सर्व मागण्या शासनाकडे मान्य असून दप्तर दिरंगाई मुळे मात्र यापासून वंचित राहावे लागत असल्याची  खंत यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.
सदर उपोषण मंडपात सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा नगर परिषद शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार ,तुकाराम यमजलवार , प्रभाकर जीवने ,बाबूसिंग जाधव ,भगवान दळवी ,प्रकाश जाधव ,वर्धमान मुंडे ,शेख यकिन ,पुडे , अशोक भोसले ,अशोक काळे ,शंकर शिराळे अहेसानउल्ला खान  ,श्रीमती इंदिरा भालेराव ,कर्तारसिंग पडवळे , दिलीप गुंडावार ,भगवान कांबळे सह अनेक सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.

 

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!