सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना मोफत आरोग्यम कार्ड विमोचन व वाटप कार्यक्रम संपन्न.

youtube

सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना मोफत आरोग्यम कार्ड विमोचन व वाटप कार्यक्रम संपन्न

 

उमरखेड :

तालुक्यातील तळागाळातील प्रत्येक गरजू रुग्णांना त्यांची कुठल्याही प्रकारची ससेहोलपट न होता आरोग्य सुविधा मोफत व सहजरीत्या मिळाव्या यासाठी सहस्त्रबाहू ट्रस्ट द्वारा आरोग्यम कार्ड विमोचन व वाटप कार्यक्रम राजस्थानी भवन येथे आयोजित केला होता. यावेळी उपस्थित मंचावरील मान्यवराचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार श्री. नामदेव ससाने यांनी असे म्हटले की सहस्त्रबुद्ध चारिटेबल ट्रस्ट ने जो मानस ठेवला आहे की 500 बेडची सुविधासाठी आमच्याकडून जी काही होईल मदत आम्ही करायला तयार आहोत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नितीन भुतडा यांनी सांगितले संकल्प छान आहे तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल साठी जी काही मदत लागेल. मी वेळोवेळी तत्पर राहुन करेल. गंभीर आजाराच्या गरजू रुग्णांना ट्रस्टच्या मोफत आरोग्य सुविधांची माहिती देतांना ट्रस्ट चे प्रमुख श्री. सचिन जयस्वाल म्हणाले की, उमरखेड तालुक्यात 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय, निशुल्क ब्लड बँक , मोफत अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया रुग्णांसाठी मोफत भोजन व्यवस्था, व्यसनमुक्ती व सत्संग केंद्र, एकाकी वृद्धांसाठी वृद्धाश्रम व अनाथासाठी शिक्षण या व्यवस्थेसह सुसज्ज असे हॉस्पीटल उभारणीचा आमचा संकल्प असुन त्यासाठी सर्वांनी आपल्या विभागामध्ये आमचा संकल्प पूर्ण करण्याकरिता तन मन धनाने मदत करावी असे आवाहन केले. राजस्थानी भवन येथे गरजू रुग्णांना आरोग्यम कार्ड वाटपाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्टने आत्तापर्यंत गरजू रुग्णांना 23 लाख रुपयाच्या औषधी मोफत दिले त्याच सोबत कोरोना काळात पाच हजार सॅनिटायझर , हॅन्ड ग्लोज व औषधी व इतर साहित्य वाटप करण्यात आले. वरील सुविधा गरजू रुग्णांना एकाच ठिकाणी पुरवण्याचा संकल्प सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट ने केला आहे . परिसरातील गरजूंना सुविधा सहज उपलब्ध करण्याकरिता सदर आरोग्यम कार्ड ची नाव नोदणी करण्यात आली.
तालुक्यातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याबाबतचा सहस्त्रबाहु ट्रस्टचा उपक्रम तालुक्यातील तळागाळापर्यंत पोहचवावा या हेतुने आरोग्यम कार्ड वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा,प्रमुख नामदेव ससाने, माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद यवतमाळ . तातुजी देशमुख, मा.जि.स चिंतगराव कदम, ज्येष्ठ विधीज्ञ अँड संतोष जैन, तलाठी दत्तात्रय दुर्केवार,सरस्वती जयस्वाल (जालना) पृथ्वी राज जयस्वाल (नांदेड),किष्णा जयस्वाल, सचिव सक्रेटरी महेश काळेश्र्वरकर, डॉ. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशिष उगले ,मेडिकल संघनेचे अध्यक्ष प्रविण देशमुख ,सचिन जयस्वाल ,,प्रमिला ठाकरे ,माजी सैनिक गंगाधर हुंबे, श्री. विणकरे, . विवेक मुडे तसेच प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर व डॉ .फार्मस्टिट व सर्व पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. सुत्रंसचलन . प्रशांत आयाचीत यांनी केले तर आभार प्रदर्शन . प्रकाश दुधेवार यांनी केले व नाश्ता, चहापाना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!