सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पूरविण्याचा संकल्प ट्रस्टचे डॉ सचिन जयस्वाल यांची पत्रपरिषदेत माहिती.

youtube

सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पूरविण्याचा संकल्प

ट्रस्टचे डॉ सचिन जयस्वाल यांची पत्रपरिषदेत माहिती

उमरखेड :

तालुक्यातील तळागाळातील गंभीर गरजू रुग्णांना त्यांची कुठल्याही प्रकारची ससेहोलपट न होता आरोग्य सुविधा मोफत व सहजरीत्या मिळाव्या यासाठी सहस्त्रबाहू ट्रस्टने संकल्प केला असल्याची माहिती सहस्त्रबाहु चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ . सचिन जयस्वाल यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे .
गंभीर आजाराच्या गरजू रुग्णांना ट्रस्टच्या मोफत आरोग्य सुविधांची माहिती देतांना डॉ . जयस्वाल म्हणाले की, उमरखेड तालुक्यात 500 बेडचे सुसज्ज रुग्णालय ,निशुल्क ब्लड बँक , मोफत अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रिया रुग्णांसाठी मोफत भोजन व्यवस्था, व्यसनमुक्ती व सत्संग केंद्र, एकाकी वृद्धांसाठी वृद्धाश्रम व अनाथासाठी शिक्षण या व्यवस्थेसह अनाथआश्रम उभारणीचा संकल्प केला असून येत्या 3 जून रोजी स्थानिक राजस्थानी भवन येथे गरजू रुग्णांना आरोग्यम कार्ड वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार असून ह्या सर्व सुविधा गरजू रुग्णांना मोफत मिळणार असल्याचे डॉ सचिन जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे .
सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वी पुढाकार घेऊन आत्तापर्यंत गरजू रुग्णांना 23 लाख रुपयाच्या औषधी मोफत दिले त्याच सोबत कोरोना काळात पाच हजार सॅनिटायझर , हॅन्ड ग्लोज व औषधी वाटप करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. सदर सुविधा गरजू रुग्णांना एकाच ठिकाणी पुरवण्याचा संकल्प सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्ट ने केला आहे . परिसरातील गरजूंना सुविधा सहज उपलब्ध करण्याकरिता सदर आरोग्यम कार्ड हे हॉस्पिटल उभारणी होईपर्यंत गरजू व गंभीर आजारांच्या रुग्णांना मोफत उपचारासाठी उपयुक्त पडेल यासाठी हे कार्ड बनवण्यात आल्याची डॉ जयस्वाल यांनी म्हटले आहे .
तालुक्यातील तसेच उपविभागातील गंभीर आजाराच्या गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्याबाबतचा सहस्त्रबाहु ट्रस्टचा उपक्रम तालुक्यातील तळागाळापर्यंत संस्थेच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी येत्या 3 जून रोजी स्थानिक राजस्थानी भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात विशेष सेवा सवलत आरोग्यम कार्ड वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे .या कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा ,माजी आमदार विजयराव खडसे ,तातू देशमुख सह सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे हा सहस्त्रबाहू चॅरिटेबल ट्रस्टचा मानस असल्याचे डॉ . सचिन जयस्वाल यांनी यावेळी म्हटले आहे .या पत्रपरिषदेला ज्येष्ठ विधीज्ञ अँड संतोष जैन , तलाठी दत्तात्रय दुर्केवार , प्रमिला ठाकरे ,माजी सैनिक गंगाधर हुंबे ,संदीप ठाकरे आदींची उपस्थिती होती .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!