मालकाला चोळ अन कामात घोळ.

मालकाला चोळ अन कामात घोळ
उमरखेड – प्रतिनिधी
तालुक्यातील चातारी ग्रामपंचायत या तीन वर्ष्यात कोणत्यानं कोणत्या विषयावर चर्चेत राहत आहे.
सरपंच म्हणून रंजना संतोष माने यांनी हातात सूत्र घेतल्यापासून त्यांच्या चुकीच्या,आडमुठ्या ,भ्रस्ट आणि उद्धट वागणुकीचे प्रकरण चालू असतानाच आता एका नवीन विषयाने चातारी ग्रामपंचायत चर्चेत आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करीत असताना शहिदाना नमन करण्याचा कार्यक्रम प्राधान्याने करून शाहिदाना नमन करणारी शीला प्रत्येक ग्रामपंचायतने शासकीय असलेल्या जागी लावून नमन करण्यासाठी शीलेवर टाकावयाचा मजकूर पन प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतला पाठविला आहे. त्यात डाव्या बाजूला ग्रामपंचायतचे नाव आणि समोर उजव्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री यांचे नाव शहिदाना नमन या मजकुराच्या खाली लिहणे असे आहे.
वरिष्ठ प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार राज्यांतील सर्वच ग्रामपंचायतने अगदी जशाच्या तसा अमल केला असला तरी चातारी ग्रामपंचायत मात्र यास अपवाद ठरल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत सविस्तर असे की,प्रत्येक गावात वरिष्ठ पातळीवरून आलेल्या मार्गदर्शन आणि निर्देशानुसार शहिदाना नमन करण्याचे शीला फलक बहुतेक गावात शासकीय शाळेत किंवा सरकारच्या जागेत लावले आवश्यक आहे. पण चातारी ग्रामपंचायतने मात्र त्यात बदल करून सरपंच म्हणून स्वतःचे नाव टाकून घेतल्याने व सरपंच पती शिक्षक म्हणून नोकरी करीत असलेल्या मालकाच्या खाजगी शाळेच्या जागेत शीला लावल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत असून स्वतःचे नाव टाकून घेतल्याने समाजमाध्यमावर सरपंच पतीवर खूप टीका टिपणी पण पाहायला मिळाली.
या विषयी काही प्रमुख लोकांना विचारले असता, ग्रामपंचायत कारभारात पतीचा हस्तक्षेप होत असून या आधी काही महिन्यांपूर्वी जलजीवन योजनेचे भूमीपूजन कार्यक्रमात पण त्या बोर्डावर सरपंचाचे नाव टाका म्हणून सरपंच पती अडून बसले होते. आणि प्रोटोकॉल प्रमाणे सरपंचाचे नाव टाकता येत नव्हते तेव्हा त्या ठेकेदाराला सरपंच यांचे नाव टाकण्यासाठी एक वेगळा बोर्ड करावा लागला होता. आणि मग आपल्याला कोणी नावं ठेऊ नये म्हणून या सरपंच पतीने गावातील इतर काही प्रमुख लोकांची पण त्या बोर्डावर नावे टाकून आपल्याला कोणी काही म्हणू नये असा प्रयत्न केला होता. पण यातील एका प्रमुख व्यक्तीने ह्या दुसऱ्या बोर्डाची गरज काय आनि माझे नाव का टाकले म्हणून आक्षेप पण त्यावेळेस घेतला होता.
ओसाड पडलेली शेती कोण्या तरी चांगल्या शेतकऱ्यांनी फुलवावी आणि त्या शेतीची नासधूस तेथील सालगडयानी करावी अशी स्थिती गावाची झाली असून सरपंच पती हे शिक्षकी पेशाकडे लक्ष न देता “नको तेथे पत्नीचे नाव, सगळ्या कामात खावं खावं ” करीत असून यासाठी मालकांच्या साठी समाजमाध्यमावर नेहमी व्यस्त राहत असल्याने ” मालकाला चोळ अन कामात घोळ ” असे लोक एकमेकांत बोलत आहेत.