डोबिवली मध्ये अमानुष गँगरेप प्रकरणातील आरोपी विरूद्ध कडक करावाई करा – मानवी अन्यया निर्मूलन संघटना.
-डोंबिवलीमध्ये घडलेल्या अमानुष गँगरेप प्रकरणातील आरोपी विरुद्ध कडक कारवाही करण्याबाबत मानवी अन्याय निर्मूलन संघटनेची
डोबिवली –
अप्पर जिल्हाधिकारी याना निवेदन देवून व वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला
सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरात अत्यंत लांचानास्पद घटना घडली आहे ज्यात एका 14 वर्षाच्या अलपवयीन मुलीवर 30 नराधमांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. महीलासुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
महिलासुरक्षेच्या दृष्टीने कल्याण डोंबिवली शहरात पोलिस दल व दामिनी पथक खरचं जागरूक आहे का असा सवाल उभा राहतो?? पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ किंवा संसाधने याची पूर्ण कल्पना आहे परंतु त्याची किंमत महिलांच्या असुरक्षतेने चुकवावी हे आम्हाला मान्य नाही.डोंबिवलीच्या भोपरमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ऐकून मन सुन्न झालं.महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी ही प्रकरणं चीड आणणारी आहेत,
जानेवारीत तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत बलात्कार केला होता. त्यावेळी काढलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रिaयकर आणि त्याच्या ३३ मित्रांनी तिच्यावर ठिकठिकाणी आळीपाळीने बलात्कार केला. २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबधित तरुणांनी डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील संबधित तरुणीला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे.
बलात्कार प्रकरणातील सर्वांवर मानपाडा पोलिस ठाणे येथे ३७६, ३७६ (एन), ३७६ (३), ३७६ (ड) (अ) सह पोक्सोअंतर्गत कलम ४.६.१० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवलीसारख्या भागात अशी घटना अतिशय गंभीर आहे. यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. आरोपींना जरब बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने आतातरी तातडीने आणि गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,
महाराष्ट्रात आणि मुंबईत गेल्या काही दिवसांत महिलांवर, लहान मुलींवर बलात्काराच्या घटना वाढत आहेत.
सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण आरोपो विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने अप्पर जिल्हा अधिकारी याना गळफास देवून निषेध नोंदविला आहे संघटने तर्फे मानपाडा पोलीस स्टेशन, पोलीस उपायुक्त कल्याण याना सौ सुवर्णा ताई कानवडे ठाणे जिल्हा अध्यक्ष ,
शैनाज खत्री ठाणे जिल्हा सचिव
.
सौ गौरी क्षिरसागर -ठाणे ग्रामीण
जिल्हा संघटक
,
निशा क्षिरसागर ठाणे जिल्हा उपसचिव ,
ठाणे ग्रामीण जिल्हा सचिव सोनी जयस्वाल ,
सौ अश्विनी भालेराव ठाणे जिल्हा (ग्रामीण) उपनिरीक्षक,
मुरबाड- बदलापूर -अंबरनाथ ठाणे जिल्हा विभाग निरीक्षक –
सौ हेमा गाडे,
भिवंडी ठाणे ग्रामीण उप विभाग
(कल्याण बदलापूर – अंबरनाथ) संघटिका सौ श्रेयशी लटके ,
भिवंडी तालुका अध्यक्ष सौ वृषाली भोइर ,
कल्याण तालुकाध्यक्ष – सौ रईसा तांबे
कल्याण संघटीका सुनीता खैरनार याच्या कडून , निवेदन देण्यात आले .