ढाणकीत ३ लाख ९९ हजाराच्या गुटख्यासह २ लाखाची गाडी जप्त. [ठाणेदार सुजाता बनसोड यांची दबंग कारवाई.]

youtube

ढाणकीत ३ लाख ९९ हजाराच्या गुटख्यासह २ लाखाची गाडी जप्त.

[ठाणेदार सुजाता बनसोड यांची दबंग कारवाई.]

*ढाणकी/ प्रतिनिधी :*

नुकत्याच बिटरगाव पोलीस स्टेशन येथे रुजू झालेल्या, प्रथम महिला ठाणेदार सुजाता बनसोड यांनी, आज पर्यंत ढाणकीचे इतिहासात अवैध गुटख्यावर एवढी मोठी कारवाई कोणीच केली नसेल? एवढी मोठी कारवाई करून इतिहास निर्माण केला.
तब्बल ३ लाख ९९ हजार रुपयांचा गुटखा व २ लाखाची गाडी, असा जवळपास ६ लाखाचा मुद्देमाल जप्त करून बेधडक कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे,
दि. ११ जुलै रोजी सपोनि सुजाता बनसोड ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगांव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन, हिमायतनगर येथून एक लाल रंगाचा मालवाहू अॅपे ऑटो मध्ये, राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा माल ब्राह्मणगाव- सोईट मार्गे ढाणकीमध्ये येत आहे. सोईट गावाजवळील , हिंदु स्मशान भूमी जवळ, डांबरी रोड लगत सापळा रचून, थांबून असताना, आरोपी अब्दुल वाजिद अब्दुल करीम रा. हिमायतनगर, पोलीस स्टेशनच्या पाठीमागे हिमायतनगर जिल्हा नांदेड व सय्यद अमीर सय्यद खमर रा. हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी विक्री करण्यासाठी, राज्य शासनाने अधिसूचनेमध्ये नमूद, राज्यात निर्बंध घातलेल्या अन्नपदार्थाचा वर नमूद तपशिलाचा, मानवी सेवनास व्यापक जनहितार्थ असुरक्षित असलेला साठा, विक्रीकरिता जाणीवपूर्वक साठवून व वाहतूक विक्री करून व तशी कबुली ही देऊन, त्यांनी अन्नसुरक्षा मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२) कलम २७ कलम ३०(२) चे उल्लंघन केले आहे. जो कायद्याच्या कलम ५९ नुसार शिक्षेस पात्र आहे. तसेच त्यांनी लोकसेवकाचे आदेशाचे उल्लंघन करून, भारतीय दंडविधान चे कलम १८८ उपरोक्त आदेशाअन्वये, विषारी अन्नपदार्थाचा विक्रीकरिता साठा व वाहतूक करून भादंवी चे कलम २७२, २७३, ३२८ चे देखील उल्लंघन केले असल्याने, अब्दुल वाजीद अब्दुल करीम व सय्यद आमीर सय्यद खमर यांचे विरोधात, वर नमूद कलमान्वये कायदेशीर फिर्याद आहे. अशा लेखी रिपोर्ट वरून आरोपींविरुद्ध अप क्र. २७०/२०२३ कलम १८८, २७२, २७३, ३२८ भादंवी सहकलम ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६, नियम व नियमने २०११ चे कलम २६ (२), कलम २७ कलम ३० (२) (अ) कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे .
सदरची कार्यवाही डॉक्टर पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, प्रदीप पाडवी उप.वि.पो.अ.उमरखेड यांचे मार्गदर्शनात, ठाणेदार सपोनि सुजाता बनसोड यांचे आदेशावरून, पोउपनी शिवाजी टिपुर्णे, बीट जमादार मोहन चाटे, निलेश भालेराव व प्रवीण जाधव यांनी केली. पुढील तपास पोउपनि शिवाजी टिपुर्णे हे करीत आहेत.
सदर अवैध गुटख्यावर झालेल्या कार्यवाहीवर ढाणकीकर समाधानी असून, अवैध धंदेवाल्यांची मात्र झोपच उडाली आहे. तसेच एवढी मोठी कारवाई ठाणेदार सुजाता बनसोड यांनी करण्यासाठी, जी डेरिंग दाखवली ती कारवाई याआधी का झाली नाही? असाही सवाल नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत. एकंदरीत ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या दबंग कारवाईवर ढाणकीकर समाधानी दिसत आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!