निगणुर ते चिंचवाडी रस्त्यातील येणाऱ्या नाल्यात पुरात वाहुन गेलेल्या मजुराचे प्रेत अखेर सापडले

youtube

*निंगनूर ते चिंचवाडी रस्त्यातील येणाऱ्या नाल्यातील पुरात मजुर वाहून गेलेल्या तरुणाचे सात दिवसानंतर सापडले प्रेत*

उमरखेड(प्रतिनिधी)
दि. 1

 

उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेल्या निंगनूर या गावात केळी कापण्यासाठी आलेला मजूर शेख कलीम वय 32 वर्ष बोलल्या जात असून,मुळ गावं मराठवाड्यातील औढा नागनाथ असून, हल्ली मुक्काम वाई बाजार येथे सासरवाडीला होता. असेही बोलल्या जात आहे,तो मजूर केळी कापण्यासाठी त्यांच्या सहकार्या सोबत विदर्भातील उमरखेड तालुक्यातील निंगणूर या गावी आला होता.
दिवसभर केळी कापली व परत केळी कापणे झाल्यानंतर आपल्या गावाकडे परत जातांना निंगनूर येथील मोठ्या नाल्यांना फार मोठ्या प्रमाणात पूर आल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात शेख कलीम या नावाचा व्यक्ती दिनांक 22/ 7/ 2021 रोजी वाहून गेला होता.
आज त्यांचा मृतदेह या घटनास्थळापासून महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सापडला आहे,रस्त्यासाठी चिंचवाडी निंगनूर येथील जनतेनी आमरण उपोषण ही केले होते,त्या उपोषणाची सांगता तत्कालीन आमदार नामदेव ससाणे यांनी केली होती.
व हा रस्ता तीन महिन्यात पूर्ण करून देतो असे आश्वासन ही दिले होते,परंतु त्या चिंचवाडी निंगनूर या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे काम करण्यात आले नाही व पुलही झाला नाही,त्या फुलाचे वारंवार निवेदन देऊन आत्तापर्यंत त्या पुलाची उंची वाढवण्यात आलेली नाही पुलावर पाणी आल्यावर रस्त्याअभावी व पूला अभावी शेख कलीम यांना आपला प्राण गमवावा लागला.
असे बरेच प्रसंग त्या रस्त्या अभावी व पुला अभावी घडले. त्या पाण्याचा पुरात वाहुन गेलेल्या व्यक्तीला त्यांच्या सहकाऱ्यांनी व निगंनुर येथील स्थानिक नागरिकांनी यवतमाळ येथील आपत्कालीन दल यांच्यामार्फत तीन दिवस शोध मोहीम राबवून गावकऱ्यांनी शोधले,परंतु त्यांचा शोध लागला नव्हता त्यामुळे तीन दिवसानंतर शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
स्थानिक बकर्या चारनार्या नागरीकांना यांनी नाल्यातील पाणी कमी झाल्यावर त्यांचा मृतदेह एका झाडाला अडकलेल्या अवस्थेत सापडला या घटनेची माहीती मिळताच चिल्ली येतील पोलीस पाटील राजु काशीराम राठोड यांनी माहागाव पोलीस स्टेशन ला माहीती दिली.
या वेळी निंगनूर येथील पोलीस पाटील ऊत्तम मुढे चिंचोली येतील माजी पो पाटील जयंवतराव राठोड पिटुं जयस्वाल हे हजर होते पुढील तपास माहागाव पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक बालाजी शेगेंपल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार करीत आहे.

*फोटो, मृतकाचा*

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!