थंडीचा पारा वाढला , न.प. निवडणूक ‘एक्झिट पोल’ची चर्चा मात्र गरम उमरखेड, (

youtube

थंडीचा पारा वाढला , न.प. निवडणूक ‘एक्झिट पोल’ची चर्चा मात्र गरम

उमरखेड, (ता. प्र.). अवघ्या काही दिवसा पूर्वी पार पडलेल्या नगरपालिका अध्यक्षपदासाठी व नगरसेवकांसाठी निवडणुका पार पडल्यात, परंतु त्याचा निकाल लांबणीवर टाकला गेल्यामुळे कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक शेकोट्या पेटवून आकडेवारीची जुळवाजुळ करत आप आपली वजा बेरीज करताना दिसत आहे.

थंडीचा पारा वाढल्यामुळे गल्ली बोळीत. सायंकाळी शेकोट्या पेटून ऊब घेण्यासाठी लोक एकत्र जमलेली दिसत आहे

शेकोटीच्या आसपास गोळा होतात, आणि त्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीतील मतदानावर रंगलेल्या चर्चा ऐकायला मिळतात. शेकोटीवरील या गप्पांमध्ये एक्झिट पोलच्या रूपात निवडणुकीच्या विविध चर्चाचा उधाण येत आहे.

चर्चेत, कोणत्या वॉर्डात कोणाचा प्रभाव अधिक होता, यावर मते व्यक्त केली जात आहेत. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर कोण ठरू शकतो, याचे समीकरणे मोठ्या आवेशाने सांगितली जात आहेत. तसेच, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याची गणिते जुळविण्याचे प्रयत्न देखील सुरू

आहेत. हॉटेलवरील जेवणावळी आता थांबलेल्या आहेत. पक्षाच्या नेतेमंडळी देखील आपल्या उमेदवारांची आणि जनतेची स्थिती समजून घेण्यासाठी मतदानाची परिस्थिती व मतांची प्रवृत्ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मतमोजणीची तारीख लांब असल्याने, प्रत्येकाचे भवितव्य मतपेटीत अद्याप बंद असले तरी शेकोटीवर चाललेल्या गप्पांमध्ये वेगवेगळ्या एक्झिट पोल्स सुरू आहेत.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!