देश चालला चंद्रावर . .अन् बाबुराव खाटेवर जातोय रुग्णालयात  रस्ता नसल्याने वृद्धास खाटेवरून नेले रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षात जनुना वरुडबीबी गावांनी विकासाचा सुर्य पाहीला नाही.

youtube

देश चालला चंद्रावर . .अन् बाबुराव खाटेवर जातोय रुग्णालयात 

रस्ता नसल्याने वृद्धास खाटेवरून नेले रुग्णालयात

अमृतमहोत्सवी वर्षात जनुना वरुडबीबी गावांनी विकासाचा सुर्य पाहीला नाही

 

उमरखेड :-
दळणवळण व्यवस्था ही देशाच्या समृद्धीचे लक्षण आहे . राष्ट्रीय महामार्गानंतर आता समृद्धी महामार्ग निर्माण करण्याची सरकारची तयारी सुरु आहे . राष्ट्रीय महामार्ग खेड्यापाड्यांना जोडल्या गेल्याने अशा गावांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होत असतानाच देशाचा मोठया थाटामाटात मानला जात आहे . मात्र दुर्दैवाने अनेक खेडेगावांचे रस्त्याअभावी बेहाल असल्याचे वास्तव जनुना – वरूडबीबी या अवघ्या दोन किलोमिटर रस्त्यावरून बाबुराव मेंढके या वयोवृद्ध रुग्णाला चिखलातून वाट काढून खासगी रुग्णालयात न्यावे लागल्याने शासनाच्या कारभाराची लख्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत .
तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथे चिखलाच्या रस्त्यामुळे गावात वाहन येत नाही एका वयोवृद्ध रुग्णाला उपचार करीता नेण्यासाठी दोन किलो मिटर खाटेवर उचलुन नेण्यात आले. सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वरुडबिबी गट ग्रामपंचाय अंतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटे गाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण गावाला अजुन पर्यंत रस्ता नाही. पावसाळ्यात आहे तो रस्ता पुर्णतः चिखलमय झालेला आहे. अशा परिस्थितीत मागील दहा वर्षात रस्त्यातच अनेक गरोदर महिलाची प्रसूती झाली आहे. आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना तातडीचे वैदयकिय मदत मिळणे अशक्य आहे. असेच एका वृद्ध व्यक्तीस खाटेवरून रुग्णालयात नेले आहे, याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा लोकप्रतीनिधी, व प्रशासनाला साकडे घातले परंतु सुमारे 100 ते 150 लोकसंख्या असलेल्या जनुना गावाच्या नागरीकांच्या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देतील ते लोक प्रतिनीधी व प्रशासन कसले ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत . परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनुना गावकऱ्यांना रस्ते सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “देश चालला चंद्रावर . .अन् बाबुराव खाटेवर जातोय रुग्णालयात  रस्ता नसल्याने वृद्धास खाटेवरून नेले रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षात जनुना वरुडबीबी गावांनी विकासाचा सुर्य पाहीला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!