आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्या व त्यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे उमरखेड येथील ग्रुपचे ॲडमिनसह चार ईसमांविरुद्ध गुन्हे दाखल.

youtube

जनसमाज धार्मिक तेढ अथवा शत्रूतत्वाच्या ,द्वेषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित व त्यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे उमरखेड येथील ग्रुपच्या ॲडमिसह 4 ईसमां विरुद्ध गुन्हे दाखल.

उमरखेड
जिल्ह्यातील नुकत्याच घडलेल्या जातीतील तणावपूर्ण घटनेनंतर पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी सदर घटना विश्लेषण करून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व भविष्यात जातीय सलोखा व समस्या वृद्धिंगत करण्यासाठी तसेच सामाजिक एकोपा व साहार्द भाव कायमपणे व अंखड पणे टिकविण्यासाठी विविध समाज माध्यमातून त्याचा सोशल मीडियावर प्रसारित होणारे अआक्षेपार्ह व जनप्रक्षोभक पोस्ट यांना प्रभावीपणे प्रतिबंधित करण्याकामी दभारतीय दंड संहितेच्या कलम 505, 153, व 116 नुसार दंडनीय अपराध असल्याचे फौ.प्र.सं. प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश Prohibitory Ordear निर्गमित करणे आवश्यक असल्याबाबतचे जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र क्रमांक पो अय/जिवीशा/प्रतिबंधक आदेश/ 4269/2021 दिनांक 18/ 12/21 कळविले वरून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याद्वारे सदरचा आदेश क्रमांक गृह शाखा डेस्क 12 वी 1522- 32,2021 अन्वये पारित करण्यात आला.
कोणत्याही प्रकारे धर्म ,भाषा ,जात,किंवा जन समाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरून निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रूत्वाच्या, व्देषाच्या भावना निर्माण होईल असा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अनाधिकृत माहिती विविध समाज माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहतील असे आदेश पोलिस अधीक्षक यवतमाळ यांच्या विनंती पत्रा वरून जिल्हाधिकारी यवतमाळ अमोल शेंडगे यांनी दिनांक 18/ 12 /2021 रोजी निर्गमित केलेले आहेत.

सदर आदेशात निरनिराळ्या धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगरजाती अगरसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि त्यामुळे सर्वाजनिक प्रशांतात बिघडते किंवा बिघडणे साभव्य असते अशा पोस्ट विविध समाज माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या आदेशान्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव ,अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागांमध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल व त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या समुहातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गा विरुद्ध किंवा समूह विरुद्ध कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट विविध समाज माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविणारे या आदेशन्वये अपराधी राहतील.
दिनांक 17/ 12/ 21 रोजी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्या मुळे एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या वरून पोलीस स्टेशन उमरखेड येथे 646/ 2021 कलम 295- 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण उमरखेड शहरांमध्ये पसरून काही समाजकंटकांनी या घटनेचा गैरफायदा घेत संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण तयार करून शहरवासीयांना व सोबतच प्रशासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला यावरून दिनांक 18/ 12 /2021 रोजी या समाजकंटक विरुद्ध अप क्रमांक 648/ 2021 कलम 141, 147 ,149, 427 ,336, 148 भादवि कलम 135 मपोका चा गुन्हा दाखल करण्यात आला. उमरखेड शहरात दोन धर्मात तणाव निर्माण होऊ उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा काही मजकूर समाज कंटकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून छुप्या रीतीने दोन समाजामध्ये अधिक तेढ कशी निर्माण होईल व त्यातून तीव्र दंगल परिस्थिती कशी निर्माण करता येईल हे वरून काही चिथावणी व द्वेष वाढवणारे पोस्ट मेसेजस तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केले. सदरचा सोशल मीडिया प्रसारण सायबर सेल यवतमाळ यांच्याद्वारे पाळत ठेवून असल्याने सदर प्रकार लक्षात येताच पोलीस स्टेशन उमरखेड येथे आज दिनांक 20 /12 /2021 रोजी जनसमाज धार्मिक तेढ अथवा शत्रूत्वाचा व्देशाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट व्हाँट्सअप ग्रुप वर प्रसारित व त्यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे उमरखेड येथील ग्रुपच्या ॲडमिन सह चार इस्मां विरुद्ध कलम 153, 153 (अ)116, 188 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध समाज माध्यमातून तसेच सोशल मीडियावर जो कोणी व्यक्ती, संस्था, संघटना ,अँडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांच्या ग्रुपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारित होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर ॲडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त राहिल.आदेशाची अवज्ञा करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिताच्या कलमान्वये करण्यात येईल असेही कार्यवाहीतुन स्पष्ट करण्यात आले. डॉ. दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली संपूर्ण सदर घटनेची.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “आक्षेपार्ह पोस्ट व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्या व त्यावर प्रतिक्रिया दिल्यामुळे उमरखेड येथील ग्रुपचे ॲडमिनसह चार ईसमांविरुद्ध गुन्हे दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!