आदर्श व्यवस्थापन…. रामभाऊ देवसरकर

youtube

आदर्श व्यवस्थापन…म्हणजे रामभाऊ देवसरकर
उमरखेड …. सविता चंद्रे
राजकारण हा विषयच स्पर्धेचा, दगदगीचा आणि सतत कार्यरत ठेवणारा आहे. अनेक जण वेगवेगळ्या अपेक्षांनी नेत्याकडे पाहत असतात. त्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्याचबरोबर कोणालाही नाराज न करण्याची खुप मोठी कसरत करावी लागते. हि कसरत पूर्ण करत असताना जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर आपली अमिट छाप पाडणारे, एक सर्वसामान्य कार्यकर्ता, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस तथा यवतमाळ जिल्हा कुणबी समाज अध्यक्ष श्री राम अनंतराव देवसरकर आणि आता जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती हा राम भाउंचा प्रवास प्रेरक आहे, रोमांचक आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी आहे. रामभाऊ यांच्याकडे हे कौशल्य अगदी वाखाणण्यासारखे आहे. गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी. जनभावनेचा मूड जाणण्यासाठी, लोकसंपर्कासाठी, जनसंपर्क हा प्रत्येक राजकीय नेत्याचा ऑक्सिजन असतो. त्यातून जनतेशी सतत ‘कनेक्ट’ राहणं अर्थ आणि बांधकाम सभापती राम देवसरकर यांच्यासारख्या गतिमान नेत्याच्या राजकारणाचाच अतूट भाग असतो. तेच त्यांचं मुख्य राजकीय भांडवल असतं. त्याच बळावर देवसरकर यांच्यासारखा नेता ‘मास अपील’ मिळवतो. लोकनेता बनतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, त्यांना प्रभावित करणं आणि आपलं भवितव्य निश्चित करणं, ही तळागाळातून वर आलेल्या प्रत्येक लीडरची कार्यशैली असते.म्हणूनच जिल्ह्यातील अगदी वणी पांढरकवडा ते विदर्भाचे शेवटचे टोक असलेल्या उमरखेड पर्यंत त्यांचे चाहते आणि प्रशंसक सर्वत्र मोठया संख्येने आढळतात. ज्यांना ‘मास लीडर’ म्हटले जाते, त्या वर्गातले रामभाऊ देवसरकर अग्रगण्य नेते आहेत.
खरं तर राजकारण्यांचा रुबाब काय असतो, हे नव्याने सांगण्याची गरज नाही, मात्र रामभाऊ येथे अपवाद ठरतात. त्यांना खुर्चीचा किंवा पदाचा थोडासाही गंध नाही म्हणूनच ते सभापती असले तरी आपण आधी कार्यकर्ते आहोत याचा विसर ते पडू देत नाहीत. अर्थ आणि बांधकाम अश्या दोन दमदार खाती जवळ असताना हा भला माणुस थोडीशीही अरेरावीची, गर्वाची भाषा वापरात नाही. याचे नवल तर वाटणारच. सौजन्यशील आणि अतिशय नम्रता असलेल्या भाषेतून अगदी सामान्य व्यक्तीला ते आपल्या साधेपणाचा परिचय जवळून देतात.जिल्ह्याच्या राजकारणात ज्यांनी आपल्या वेगळेपणाची छाप जनतेवर उमटवली आहे, अशा मोजक्या नेत्यामध्ये आता जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती राम देवसरकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
पदाच्या माध्यमातून सत्तेची धुरा दिल्यानंतर जिल्हा विकासापासून दूर कसा? असा प्रश्न विचारणा-याना सद्या जिल्ह्याचा विशेषतः उमरखेड विधानसभेचा विकास आरसा झाला आहे. जीव ओतून काम करणा-या या नेत्याने सद्या “रामसेतू ” या “अभ्यासिका”ची लोकचळवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी निर्माण केली आहे. यामाध्यमातून त्यांनी “गाव तेथे अधिकारी” नवा मंत्र दिला आहे. शाळा, रस्ते चिमुकल्याची अंगणवाडी ,रस्ते , समाज मंडप बाबधकाम या विकास मोहिमेत स्वत:ला झोकून देत असून संपूर्ण जिल्ह्यात उत्साहवर्धक वातावरण निर्मिती होऊ लागली आहे. जिल्ह्याच्या किंबहुना विधानसभेच्या राजकारणात अथक परिश्रमाच्या बळावर स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणारा नेता, सध्याच्या परिस्थितीत फार कमी चेहऱ्यांपैकी एक आश्वासक चेहरा अशी ओळख रामभाऊंनी निर्माण केली आहे. आदर्श लोकनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामभाऊ. मुख्यत्वे सत्ता वाट्याला येण्याचे प्रसंग अपवादात्मक असताना जिद्दीने आणि चिकाटीने विकासकार्य सुरू ठेवायचे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु हे आव्हान, हि लीलया देवसरकर यांनी उत्कृष्ट रीतीने पेलली आहे त्यांच्यामध्ये एक धडपडया कार्यकर्ता, कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा नेता, प्रेमळ मित्र, वत्सल पिता आणि कुटुंबवत्सल माणूस लपलेला आहे. त्यांच्या निकट संपर्कात आलेल्यांना यात कोणतीही अतिशयोक्ती वाटणार नाही. जिल्ह्याच्या विशेषतः उमरखेड तालुक्याच्या सहकार, राजकारण व समाजकारण, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. मुळात “राम ” या नावातच एक मोठी ताकद आहे. स्वतःचा जनसंचय हीच देवसरकर यांची खूप मोठी ताकद आहे. हात लावील त्याचे सोने करील, अशी कार्यशैली असलेल्या देवसरकरांचा स्पर्श या भागाला विकासाचा ठरावा, अशी अपेक्षा आता उमरखेड विधानसभेतील जनतेला वाटू लागली आहे. त्यांना मानणारे व त्यांच्या शब्दासाठी तत्पर असणारे कार्यकर्ते दिवसेंदिवस जिल्हाभर तयार होत आहेत. रामभाऊ जेथे जातील तेथे राजकारण सोडून माणसे मिळत असल्याचा इतिहास सर्वांसमोर आहे. त्यामुळे जनसंचय करण्यात हातखंडा असलेल्या देवसरकर यांना सर्व जनतेकडून आपलेपणाची हाक मिळत आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक ही त्यांची खासियत आहे.
जिल्ह्याचे राजकारण आणि समाजकारण, अर्थकारण बदलू पाहत आहेत त्यात त्यांचा नक्कीच मोलाचा वाटा असणार आहे.जे जे उत्तम आहे ते समजून घेण्याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. समोर येणाऱ्या प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, दूरदृष्टी, सर्वांचा विचार व विकास, विकास आणि फक्त विकासाचा ध्यास, प्रेमाचे आभाळ, मायेचा महासागर नेहमीच जमिनीवर असणारा जनसेवक म्हणजे रामभाऊ. मागील दीड वर्षांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात देवसरकर यांनी सुद्धा हेच केलं. त्यामुळेच कि काय जिल्हाभपरिषदेच्या महाविकास आघाडी सरकार मधील एक कर्तबगार कार्यकर्ता सभापती अशी छबी जनतेत तयार झालेली दिसून येते. त्यांच्याएवढा गतिमान वित्त नियोजन आणि बांधकाम आजवर जिल्ह्याला लाभला नाही अश्या बोलक्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटू लागल्या आहेत
स्थानिकांशी उत्तम संवाद साधण्याचं कौशल्य त्यांच्या अंगी ठासून भरलेले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांनी कठोरपणं राबविल्या. त्यांच्या अंमलबजावणीवर त्यांचं बारीक लक्ष असत. उमरखेड तालुक्यातील सध्याच्या झंझावाती दौऱ्यांतून शासकीय योजनांबद्दलचा थेट ‘फीडबॅक’ त्यांना जनतेतून मिळतो. रामभाऊंचा रुबाबदार पणा, गोरगरिबांना आधार देणं, वेगवेगळे प्रश्न मार्गी लावणं यातच त्यांच वेगळेपण दिसून पडते. भाऊंनी लोकांच्या मनावर राज्य केल आहे त्यांच्या वक्तृत्व शैलीने तर सभास्थळी प्रचंड उत्साहाच वातावरण आपोआप निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. दूरदृष्टीचा नेता सतत कार्यमग्न असतो. त्याप्रमाणेच रामभाऊ दिवसरात्र मेहनत घेत असतात. विकासासाठी त्यांचे सतत चिंतन सुरू असते.पक्षीय भेद बाजूला सारून सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रसंगी दोन पावले मागे येऊन विरोधकांना मदत करण्याबाबतही ते आग्रही असतात. विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या अशा या लोकनेत्याला वाढ दिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा, त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे बळ मिळो हीच महाराष्ट्रांची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व राजमाता माँ जिजाऊ चरणी प्रार्थना.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!