काँलेज कडुन घराकडे जाणाऱ्या विदयार्थी ला टिपरची जबरदस्त धडक युवक जागीच ठार उमरखेड – दि ३०
काँलेज कडुन घराकडे जाणाऱ्या विदयार्थी ला टिपरची जबरदस्त धडक युवक जागीच ठार
उमरखेड – दि ३०
कॉलेज करून घराकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिपरने धडक दिल्याने १९ वर्षीय युवक जागेवटच ठार झाल्याची घटना सोमवार ३० रोजी दुपारी १ .४५ वाजता दरम्यान बाळदी रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली .
अपघातात मृत्यू झालेल्या मूर्तकाचे नाव अजित गजानन राठोड रा कृष्णापुर तांडा ता उमरखेड असे असून
आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH 29 CG 3519 हा असून दुपारी कॉलेजवरून घराकडे जात असताना मागून येणाऱ्या MH 48 T 5580 या टिप्परने जोरदार धडक दिल्याने बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळ अजित यांचे जागीच मृत्यू झाला .
अजित राठोड हा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकत होता .सदर अपघाताचे फिर्याद मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड व 40 वर्ष यांनी पोलीस स्टेशन फिर्याद दिली असून वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे .
सदर अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .
Noodlemagazine For the reason that the admin of this site is working, no uncertainty very quickly it will be renowned, due to its quality contents.
“This post has helped me solve my issue, thanks a ton!”