ढाणकी येथील पुलावरून युवक गेला वाहून.
ढाणकी येथील पुलावरून युवक गेला वाहून
ढाणकी प्रतिनिधी
रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी कडून महामार्गाचे काम संथ गतीने चालू असल्याने त्याचा फटका त्याच रोड वर असलेल्या कंटेनर चा क्लिनर राजा सिंग जीव घेतला ढाणकी मार्गे फुलसावनगी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल निर्मितीचे काम चालू चालू यामुळे जुन्या पुलाला तडे गेले आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते अनेक नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात सदर पूल पावसाळ्या पूर्वी होण्यासाठी गावकर्यांनी रुद्राणी कंपनी ला कळविले होते पहिल्याच पावसात सदर पुलामुळे जुन्या पुला वरून पाण्याचा प्रवाह वाहत जात आहे त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताची सूचना अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून रुद्राणी कंपनीला दिला होता परंतु कंपनी ने याकडे कानाडोळा केल्याने आज सायंकाळी सहा वाजता रुद्राणी कन्स्ट्रक्शन कंपनी कडे असलेल्या टिपर चा क्लिनर ढाणकी कडे येताना पुलावरून पायी येत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यासोबत नाल्यात वाहून गेला आज घडलेल्या घटने पासून रुद्राणी कंपनी काही सुधारणा करणार कि आणखी किती जण वाहून जाणार याची वाट तर कंपनी पाहत नाही ना लहान सहन पाणी आले तरी ढाणकी शहरात येणाऱ्या सर्व पुलावरून पाणी वाहत जाते त्यामुळे सर्व पुलाचे चौकशी करून त्वरित नवीन उंच पूल करावे अशी मागणी नागरिक करत आहेत