रूग्णकल्याण नियमक समितीच्या सदस्य पदी निवड-उदय पुडे
रुग्णकल्याण नियामक समितीच्या सदस्य पदी निवड -उदय पुडे
ढाणकी प्रतिनिधी –
ढाणकी लोकमत चे शहर प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उदय पुंडे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी च्या रुग्णकल्याण नियामक समिती च्या सदस्य पदी निवड झाली. पंचायत समिती उमरखेड चे सभापती प्रज्ञानंद खडसे यांचे ते प्रतिनिधी म्हणून रुग्णालयात काम पाहतील. सामाजिक कार्याची आवड लक्षात घेऊन त्यांची ही निवड करण्यात आली. ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात बंदी भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात त्यांच्या अडचणी जाणून त्यांचे समाधान करणार असल्याचे उदय पुंडे यांनी बोलताना सांगितले. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय लोकमत चे तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अविनाश खंदारे यांना दिले असून आपल्यावर टाकलेला विश्वासाला तडा जाऊन देणार नसल्याचे उदय पुंडे यांनी बोलताना सांगितले.