श्री रेणुकामातेच्या महाआरतीने उध्दव ठाकरेचां वाढदिवस साजरा.

youtube

श्री रेणुकामातेच्या महाआरतीने उध्दव ठाकरेचां वाढदिवस साजरा.

श्रीक्षेञ माहूर – नितीन तोडसाम

महाराष्ट्राची कुलस्वामींनी श्री रेणुकामाता मंदिराच्या गाभार्‍यात मा.मुख्यमंञी तथा शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुखी,समाधानी व दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडको तसेच शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करुन त्यांना भरभरुण उत्पन्न होवू दे अशी कामना व्यक्त करून जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या हस्ते व हजारो शिवसैनिकांच्या उपस्थित दि.२७ जुलै रोजी राञी ८:१० वा.श्री रेणुकामातेच्या प्रतिमेला अभिषेक घालून महाआरती केली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामींनी श्री रेणुकामाता महाआरती चे आयोजन करण्यात आले होते.यासाठी पक्ष प्रमुख उध्दवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्रावर भगवा फडको अशी कामना व साकडे घालण्यासाठी येथून ६० कि.मी अंतरावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील हजारो शिवसैनिक जिल्हा उपप्रमुख प्रविण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पायदळी आले होते.आर्णी येथून माहूर शहरातील टी पाईन्ट येथे आलेल्या सर्व शिवसैनिकांचे ढोल ताशात व फटाक्याच्या अतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसैनिकांनी शिवसेना जिंदाबाद उद्धवसाहेब आगे बढो या घोषणा देत उद्धव ठाकरेच्या समर्थनात शिवसेनेने आगळी वेगळी ताकद दाखवून दिली.

यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा उपप्रमुख प्रविण शिंदे,जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब मुनगिरवार, संपर्कप्रमुख संतोष ढवळे, तालुका प्रमुख रवी राठोड व शहर प्रमुख पंकज शिवरामवार, शहर संघटक बबलु देशमुख,युवासेना उपजिल्हा संघटक हर्षु राठोड,तालुका प्रमुख पवन वाघमारे, महागाव तालुका प्रमुख प्रमोद उर्फ शाखा भरवाडे, रवींद्र भारती, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, महिलाआघाडी उपजिल्हा संघटकी सविता बेंद्रे यांचासह अनेक पदाधिकार्‍याचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी भगवी शाल व श्रीफळ देवून स्वागत केले.त्यानंतर माहूर शहरात जमलेले व आर्णी येथून आलेले शिवसैनिकांनी पदयाञा करत श्री रेणुकामातेचे मंदीर गाटून रेणुकामातेची पुजा आर्चा करुण महाआरती केली यावेळी युवानेते यश खराटे,माहूर शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,मा.गटनेते दिपक कांबळे,उपनगराध्यक्ष नाना लाड,विजय कामटकर,माजी सभापती नामदेव कातले,उमेश जाधव,माजी ता.प्रमुख दिपक कन्नलवार,उप ता.प्रमुख जलील भाई,हनुमंत मुंडे,अनिल रुणवाल,अंबादास राजूरकर,सुरेश आराध्ये,खुशाल तामखाने,सदानंद पुरी,जितु चोले,बालाजी वाघमारे,रुपेश कोवे,संदीप गोरडे,विनायक देशमुख,सुरेखा तळनकर,अभिषेक जयस्वाल,अशोक उप्पलवाड, गजानन चव्हाण,पवन चव्हाण,शक्ती ठाकुर,अक्षय वाघ,संदेश हेद्रे,आकाश सातव,रहीम खान,शे.शौकत,रमेश रामेलवार,आरीफ खान,शे.वकील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.या महाआरतीला माहूर तालुक्यातील शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होती.त्यामुळे सेनेतील पडझळीचा माहूर शहर व तालुक्यात कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!