उमरखेड शहरात संभाजी भिडे च्या वक्तव्या विरोधात निवेदन देताना – युवक काँग्रेस उमरखेड महागाव विधान सभा यांची घोषणाबाजी.
उमरखेड शहरात संभाजी भिडे च्या वक्तव्या विरोधात निवेदन देताना –
युवक काँग्रेस उमरखेड महागाव विधान सभा यांची घोषणाबाजी
उमरखेड /प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोहर भिडे हे वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असून त्यांच्या विरोधात उमरखेड शहरात युवक काँग्रेस उमरखेड ,महागाव आक्रमक झाली आहे.
महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी व देशाच्या तिरंगा व राष्ट्रागीता विरोधात संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांनी वादग्रस्त व अपमानस्पद वक्तव्य केली असून या निषेधार्थ संभाजी भिडे यांना अटक करा असे निवेदन देतांना उपविभागीय कार्यलयातील अधिकारी यांना देताना युवक काँग्रेस उमरखेड महागाव
भविष्यात देशाबद्दल व महापुरुषांबद्दल अपमानस्पद वक्तव्य जो कोणी करेल युवक काँग्रेस सहन करणार नाही असा निर्धार युवक काँग्रेस.च्या उपस्थित कार्यकर्त्यांनी या वेळी केला.
यावेळी युवराज पाटील देवसरकर (विधानसभा अध्यक्ष) नंदकुमार बुटले (जिल्हा सरचिटणीस)अँड विशाल कोत्तेवार (विधानसभा उपाध्यक्ष) विकास कदम (तालुका अध्यक्ष महागाव) मनोज धुळध्वज (तालुका सरचिटणीस) सुरेश दवणे (तालुका उपाध्यक्ष) शेख तालीब अहमंद (महाराष्ट्र प्रदेश सचिव) तसेच शिवराज जमदाडे, प्रवीण धोपटे ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.