कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी कृष्णा पाटिल देवसरकर तर उपसभापतीपदी श्रीपाल आडे यांची निवड !

youtube

कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी कृष्णा पाटिल देवसरकर तर उपसभापतीपदी श्रीपाल आडे यांची निवड !

उमरखेड –
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवड ११ जून रोजी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा प्रणित वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांनी ११ जाग्यांवर यश मिळवित सत्ता राखली होती निवडी मध्ये सभापतीपदी कृष्णा पाटिल देवसरकर, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे श्रीपाल आडे यांची ७ विरुद्ध ११ मतांने गुप्त मतदान प्रक्रियेत निवड करण्यात आली आहे निवडी नंतर नवनिर्वाचित पदाधिकारी पक्ष नेत्यांनी व्ही ची पोज दिली
त्यांच्या विजयाने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला गुलाल उधळून व पारंपरिक वेशभूषेत जल्लोष करत समर्थकांनी त्यांचे स्वागत केले या वेळी आमदार किसन वानखेडे , माजी आमदार विजय खडसे , प्रकाश पाटिल देवसरकर , भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा , डॉ विजय माने , रमेश चव्हाण , डॉ अकुंश देवसरकर , जिन प्रेस संस्था शिवाजी माने , खरेदी विक्री संघ अध्यक्ष सुदर्शन रावते , बळवंत नाईक , विठ्ल वानखेडे , नितिन माहेश्वरी हे सर्व जण उपस्थित होते
सभापती पदासाठी पिठासिन अधिकारी यांचे कडे विरोधी वसंतराव नाईक शेतकरी सहकारी विकास पॅनल चे प्रविण मिराशे तर उप सभापती या पदासाठी राजु कवाने यांनी नामांकन दाखल केले होते या दोघांना फक्त ७ मते मिळाली त्यामुळे त्यांना सभापती – उपसभापती होता आले नाही निवडी नंतर भाजपा प्रणित आघाडी मिळविलेल्या पॅनलने शहरात विजयी मिरवणुक काढली यामध्ये तालुक्यातुन मोठा जनसमुदाय उपस्थित झाला होता
निवडणूक प्रक्रियेसाठी किसन पहुकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर चेतन राठोड यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली

वसंतराव नाईक शेतकरी विकास आघाडीने कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा आपली पकड मजबूत केल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोबत –
जल्लोषाचा फोटो

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!