वादळी वार्‍याचा कहर: उमरखेड शहर अंधारात, झाडे कोसळून मोठे नुकसान उमरखेड

youtube

वादळी वार्‍याचा कहर: उमरखेड शहर अंधारात झाडे कोसळून मोठे नुकसान

उमरखेड :- शहरात संध्याकाळच्या सुमारास साडेसहा वाजता आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने संपूर्ण शहर हादरून टाकले. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून काही झाडे थेट विजतारांवर कोसळली. परिणामी, शहरात वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला.

करोडी रोडवरील ३३ के.व्ही. सबस्टेशन येथून विद्युत पुरवठा थांबवण्यात आला आणि रात्री दोन वाजेपर्यंत संपूर्ण शहर अंधारात होते. काही भागांमध्ये तर रात्रभरच वीजपुरवठा बंद होता. यामुळे नागरिकांना अंधार, उकाडा आणि अस्वस्थतेचा त्रास सहन करावा लागला.

वादळामुळे केवळ विजेचा नाही तर मालमत्तेचाही मोठा नुकसान झाला आहे. अनेक झाडे घरांवर, वाहनांवर कोसळली असून त्यामुळे आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. महावितरणच्या तारा तुटल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडथळे येत आहेत.

महावितरणकडून स्थानिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन विजेच्या दुरुस्तीचे काम सुरु केले असले तरी, नागरिकांत नाराजीचा सूर आहे. आधीपासूनच तालुक्यात साधी हवा आल्यावरही वीज खंडित होणे ही वारंवार घडणारी घटना आहे. यावेळी वादळी वार्‍यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.

वादळाच्या या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे उमरखेडकर हैराण झाले असून, हवामान खात्याने यापुढे अशा प्रकारचे आणखी वादळी वातावरण राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Google Ad
Google Ad

4 thoughts on “वादळी वार्‍याचा कहर: उमरखेड शहर अंधारात, झाडे कोसळून मोठे नुकसान उमरखेड

  1. Hello this is kind of of off topic but I was wondering
    if blogs use WYSIWYG editors or if you have to manually code with HTML.
    I’m starting a blog soon but have no coding knowledge so
    I wanted to get guidance from someone with experience.

    Any help would be enormously appreciated!

    Feel free to surf to my site; read what he said

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!