आत्मसन्मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे  -शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर

youtube

आत्मसन्मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे

-शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर

उमरखेड :आत्मसन्मान पाने के लिए आत्मनिर्भर बनो ! असे मत गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत व पालक सभेत मा. शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी व्यक्त केले.
समाजाचा दृष्टिकोन बदलावयाचा असेल तर अगोदर स्वतःला बदला. विद्यार्थ्यांनी करिअर घडवतांना त्यांना इतरांच्या मदतीची गरज नाही, फक्त त्यांना मार्गदर्शनची आवश्यकता असते. आई-वडील हे जीवनातील आपले सर्वस्व असतात, बाकी सर्व निमित्त मात्र आहेत. यामुळे आई वडिलांचा मान सन्मान करायला शिका. यासोबत जीवन जगतांना जेवण मिळालं नाही तरी चालेल पण , माणसाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे . कारण हीच असे एकमेव बाब आहे जी कुठल्याही दुकानात मिळत नाही . महाविद्यालयीन जीवन आकर्षणाचं केंद्र असतं पुढे जायचं असेल तर या आकर्षणाला बाजूला काढायला शिका . आकर्षण क्षणिक असतं ते आयुष्यभर टिकत नाही . कालांतराने ते कमी कमी होत जात. यामुळे ते बाजूला सारून त्यावर आपल्याला योग्य मार्ग काढता आला पाहिजे व हा मार्ग शिक्षकच दाखवू शकतात यामुळे, महाविद्यालय व शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ असतात. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी मा. रवींद्र काटोलकर यांनी केले. ते गो. सी.गावंडे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ११ वी कला व वाणिज्य मधील नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत व पालकांच्या सभा समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.रामसाहेब देवसरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.या.मा राऊत ( सचिव , य.जि.अ.कु. समाज) , मा.अनिल शेंडगे ( विस्तार अधिकारी ), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, श्री. प्रमोद देशमुख ( मुख्याध्यापक ) , पर्यवेक्षक बी. यू. लाभशेटवार व पालक प्रतिनिधी श्री. कांबळे उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बी. यू. लाभशेटवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून कनिष्ठ महाविद्यालयातील सोयी सुविधेबरोबरच महाविद्यालयात चालणाऱ्या सामाजिक उपक्रमा बद्दलची माहिती देवून, महाविद्यालय केवळ संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक दर्जा राखणारे महाविद्यालय आहे. हि माहिती मांडली.
कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उपलब्ध असणारे विविध उपक्रम व सुविधांची माहिती या प्रसंगी उपस्थित विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयीन प्राध्यापकांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रताप पी.शिंदे व प्रा.एस.बी. भुतडा यांनी केले तर आभार प्रा. बी.यू. लाभशेटवार यांनी मानले.विद्यार्थी स्वागत व पालक मेळावा या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापकांनी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Google Ad
Google Ad

9 thoughts on “आत्मसन्मान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे  -शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर

  1. Your blog is a constant source of inspiration for me. Your passion for your subject matter shines through in every post, and it’s clear that you genuinely care about making a positive impact on your readers.

  2. Your blog is a treasure trove of knowledge! I’m constantly amazed by the depth of your insights and the clarity of your writing. Keep up the phenomenal work!

  3. Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem

  4. Your writing is like a breath of fresh air in the often stale world of online content. Your unique perspective and engaging style set you apart from the crowd. Thank you for sharing your talents with us.

  5. Wow superb blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is magnificent as well as the content

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!