पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबत फेसबुकवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या नराधमावर कायदेशीर कारवाई करा. – जय मल्हार संघटना 

youtube

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबत फेसबुकवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या नराधमावर कायदेशीर कारवाई करा. – जय मल्हार संघटना

[सदर नराधमावर बिटरगाव पोलीस स्टेशन येथेच गुन्हा दाखल करावा ;अन्यथा दोन दिवसानंतर ढाणकी येथे उग्र आंदोलन होईल.- ढाणकीकर एकवटले]

*ढाणकी / प्रतिनिधी :*

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं देश सेवेसाठीचे योगदान, कुठलाही भारतीय कधीच विसरणार नाही. परंतु समाजातील काही विकृत मानसिकतेला वेळीच ठेचून काढणे हे सुद्धा सद्यस्थितीत अगत्याचे आहे. नुकतेच सुनील गोपाळराव उभे या नराधमाने आपल्या फेसबुक अकाउंट वरून, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात अत्यंत अश्लील व अपमानास्पद भाषेत कमेंट केलेली राज्यात सर्वांनीच पाहिली वाचली असेल. यामुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सामाजिक शांततेस व एकात्मतेस धोका पोहोचवणारा नराधम सुनील गोपाळराव उभे याने अशा प्रकारचे वक्तव्य करून, कायद्याचे उल्लंघन केले असून सदर नराधमावर, त्याच्या संबंधित फेसबुक पोस्ट कमेंट ची चौकशी करून, आवश्यक ती कठोरात कठोर कारवाई करावी. अशा आशयाचे निवेदन, आज जय मल्हार संघटना ढाणकी तर्फे पोलीस स्टेशन बिटरगावचे ठाणेदार यांना देण्यात आले.
याप्रसंगी ढाणकी शहरातील सर्व जाती धर्मातील, सर्वपक्षीय प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी सुनील गोपाळराव उभे या नराधमावर, बिटरगाव पोलीस स्टेशन येथेच गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी लावून धरली. असे न झाल्यास दोन-तीन दिवसानंतर ढाणकी येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व त्या शासन, प्रशासन जबाबदार असेल. असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांचे सहित समस्त ढाणकीकरांनी पोलीस प्रशासनाला दिला.
याप्रसंगी बाळासाहेब चंद्रे,आनंदराव चंद्रे,प्रवीण पाटील मिराशे, संजय सल्लेवाड, ओमाराव चंद्रे, दिपक पा. चंद्रे,अमोल तुपेकर, सुनील मांजरे, बापूराव वैद्य, खंडेराव लकडे, संतोष लकडे, साहेबराव वाघमोडे, उकंडराव लकडे, रामेश्वर लांडगे, मल्हार चंद्रे, संतोष चिलकर, लक्ष्मीकांत चंद्रे, गजानन वैद्य, राहुल चंद्रे, प्रेमराव सलगर, माधव लकडे, दिगंबर वैद्य, शुभम दिवसे, संजय बिटेवाड, गजानन चंद्रे, साहेबराव लकडे, दत्ता हाके, श्रीकांत चंद्रे, संदीप वैद्य, रवि चंद्रे, शेख एजाज पटेल, विकास दिवसे, आकाश भोळे, भास्करराव चंद्रे, प्रेमराव चंद्रे, गणेश बिटेवाड, इत्यादी ढाणकीकर उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबत फेसबुकवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या नराधमावर कायदेशीर कारवाई करा. – जय मल्हार संघटना 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!