प्रा. नलिनी ठाकरे यांचा ऐनवेळी मोठा राजकीय निर्णय; राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश, नगराध्यक्ष पदाचा अर्जही मागे
प्रा. नलिनी ठाकरे यांचा ऐनवेळी मोठा राजकीय निर्णय; राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश, नगराध्यक्ष पदाचा अर्जही मागे
उमरखेड :– उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रा. नलिनी ठाकरे यांनी २१ नोव्हेंबर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. श्री बसवेश्वर मंदिर सभागृहात आमदार किसन वानखेडे व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
प्रा. ठाकरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांच्याकडे आपला नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज स्वेच्छेने मागे घेतला असून, त्या पुढील काळात भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निधी भुतडा यांच्या प्रचारासाठी पूर्ण सामर्थ्याने काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
आपली उमेदवारी ऐनवेळी रद्द करण्यासाठी जिल्हा तसेच स्थानिक राष्ट्रवादी नेतृत्वाने खेळ केल्याचा आरोप करत, “योग्य वेळी मला वगळून दुसऱ्यालाच अर्ज भरण्यास सांगण्यात आले. त्यामुळेच मी राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे त्या म्हणाल्या.
प्रा. नलिनी ठाकरे यांचा हा अनपेक्षित निर्णय निवडणूक रणांगणात मोठी चर्चा निर्माण करणारा ठरला आहे.




Your writing has a way of resonating with me on a deep level. I appreciate the honesty and authenticity you bring to every post. Thank you for sharing your journey with us.