बंदीभागातील वर्ग २ च्या जमीनीचे आपसीवाटणीपत्र करा सामाजीक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांचे नेतृत्वात बंदीभागातील १६ गावचे नागरिक धडकले

youtube

*बंदीभागातील वर्ग २ च्या जमीनीचे आपसीवाटणीपत्र करा

सामाजीक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांचे नेतृत्वात बंदीभागातील १६ गावचे नागरिक धडकले

प्रतिनिधि
उमरखेड :

वर्ग 2 च्या जमिनीचे आपसीवाटणी पत्र करण्याकरिता परवानगी देण्यात यावी व कॅम्प चे आयोजन करण्यात अशी मागणी
तालुक्यातील बंदीभागातील १६ गावातील नागरिकांनी काँग्रेसचे सामाजीक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांचे नेतृत्वात आज दिनांक २० रोजी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन केली आहे .

उमरखेड तालुक्यातील बंदीभाग हा नेहमीच प्रत्येक विकास कार्याबाबत मागासलेला असून ह्याकडे नेहमीच लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे . त्यामुळे तालुक्यातील बंदीभागातील मौजे- खरबी, टाकळी (वन), सेवालालनगर, कोरटा, मोरचंडी, चिखली, एकंबा, गाडी, बोरी (वन), थेरडी व सोन या गावातील शेतकऱ्याच्या वर्ग 2 च्या सातबारावर आपसीवाटणी पत्र करण्यासाठी परवानगी द्यावी व खरबी, कोरटा, मोरचंडी या गावात कॅम्प लावून आपसी फेरफार करावे. जेणे करुन जे शासनाचे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याना अनुदान मिळेल व लवकरात लवकर कॅम्प आयोजन करुन लागणाऱ्या सर्व कागद पत्राची व कॅम्प च्या तारीखेचे माहिती वरील गावच्या शेतकऱ्यांना ‌द्यावी अशी मागणी
सदानंद नारायन पांडे, विश्वनाथ कान् सोंगे, विलास साहेबराव आंभोरे, माधव पंजाराम सोंगे
,गणपत बोबले, ज्ञानेश्वर नागोराव वाकोडे,पुंडलीक रामजी वजारे, नितीन प्रकाश राजने, रामदास नारायण आभोरे, अशोक प्रभात राजने, संतोष खंड्जी वंजारे,कैलास साहेबराव आंभोरे, भारत रामा कवडे,रंगराव विठ्ठठलराव भुसारे, भगवान चंपत पिठलेवाड, लक्ष्मण दादाराव हाराळे, काळूराव नैसाज बरगे,वंसत यादव लाडगेवाड, विलास शेशराव पिठलेवाड,अर्जन पिठलेवाड,बंडू शेषेराव सातप्ते
,प्रभाकर शंकर बरगे, संतोष सूर्यभान भोकरे
,श्रीहारी विश्वनाथ ताळमवाड, विश्वनाथ देवदास सातप्ते,गजानन माधव पवार, माधव राजाराम पेंडारवाड यांनी केली आहे .

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!