शेतकऱ्यांचे हित दाखवून खोक्यावर तुटून पडले बोके [ मतदार संघात कार्यकर्ते उपाशी, नेते एकदम तुपाशी ]

youtube

शेतकऱ्यांचे हित दाखवून खोक्यावर तुटून पडले बोके
[ मतदार संघात कार्यकर्ते उपाशी, नेते एकदम तुपाशी ]
उमरखेड प्रतिनीधी:-
गेल्या दशकभरापासुन उमरखेड माहागाव विधानसभा मतदार संघातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी सातत्याने नापिकी अतिवृष्टीचा सामना करतो आहे, सत्ताधारी व विरोधक मात्र राजकाणाचा चष्मा काढून या कडे पाहतांना कधी दिसलें नाही. विधानसभा निवडणुका लागल्या आणि एकाएकी साऱ्यांना शेतकऱ्यांचा पुळका आला आहे . शेतकऱ्यांचे हिताच्या गोष्टी सांगून सारे आपली राजकीय पोळी शिजवू पहात असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसते. आता तर कार्यकर्त्यांचे नाव पुढे घालून एका उमेदवाराचे खोकेच पळवून नेल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. कार्यकर्ते आता एकमेकांना विचारू लागले आहे,’ तुले काय भेटलं ‘ आरे! काहीच नाही भेटलं. म्या नुसतंच ओठ चाटलं, माह्यावाल्या नावावर दुसऱ्याचं बिल फाटलं..,असे एक से बढकर एक किस्से बाहेर येऊ लागले आहे.
आपल्याला शेतकऱ्याचं सरकार आणायचं आहे, असं सांगून जनतेत जाणाऱ्यांनी एका बड्या उमेदवाराला टोपी दिली. कार्यकर्त्यांना वाटा साठी दोन खोके नेले आणि गडप केले. गाड्या दिल्या पण वरखर्च दडपुन टाकला. आपल्याला शेतकऱ्याचं सरकार आणायचं आहे न, मग फिरा फुकट असा सारा मामला आता कार्यकर्त्यांना जेरीस आणू पहात आहे. घरच्या भाकरीवर लढाई जिंका, मावळे कसे लढले असे सांगून केवळ तोंडाची वाफ कार्यकर्त्यांना आणि लोण्याचा गोळा नेत्यांना अशी विभागणी झाल्याचे बोलल्या जाते. काही चतुर कार्यकर्त्याला याचा सुगावा लागला आणि हे बिंग फुटल्याची माहिती आहे. त्याने भररस्त्यात साऱ्यांचीच खरडपट्टी काढली. मावळे लढले ते रयतेच्या राजा साठी, तुम्ही सत्तेसाठी लढत आहात. उदया तुम्ही आले तरी शेतकऱ्यांची फसवणूकच करणार, कारण दहा वर्षात तुम्ही घरी बसून होतात असा घरचा आहेर त्याने दिला.
घाणीत हात घालण्याची सवय झालेल्या अनेकांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं आहे मात्र कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल आहे. शेतकऱ्यांचे हित दाखवून स्वतः मात्र खोके घेऊन परस्पर आपली तुंबडी भरणाऱ्यांची खमंग चर्चा ऐकू येते.एका कार्यकर्त्याने सांगितलेला किस्सा बोलका आहे.आधी त्यांना सांगितलं फिरा.. 8 तारखेला हिशोब लावू नंतर सांगितलं 10 तारखेला नंतर ची तारीख दिली 13 आणि आता 18 तारीख पे तारीख देण्यात आल्याने आता आम्हीच 20 तारीख त्यांना दिली आहे असा सज्जड दमच त्याने भरल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांचे हित दाखवून खोक्यावर तुटून पडलेले बोके आणि त्याच वेळी उपाशी कार्यकर्त्य हे विदारक चित्र दिसते.

Google Ad
Google Ad

3 thoughts on “शेतकऱ्यांचे हित दाखवून खोक्यावर तुटून पडले बोके [ मतदार संघात कार्यकर्ते उपाशी, नेते एकदम तुपाशी ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!