गांजा विक्री करणारे तिघे स्थानबद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई उमरखेड :-
गांजा विक्री करणारे तिघे स्थानबद्ध
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
उमरखेड :-
पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करणाऱ्या तिघांवर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळने NDPS कायद्यान्वये कारवाई करत १ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी पुसद–उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे मौजे घोनसरा–मोहदी रोडवर सापळा रचण्यात आला. मोटारसायकलवरून गांजा घेऊन येत असताना पोलिसांनी कारवाई केली. यावेळी एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला, तर अमरसिंग जाधव (वय ५६) व शंकर खोकले (वय ४१, दोन्ही रा. आमणी (लहान), ता. महागाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा, मोबाईल फोन व FZ मोटारसायकल (MH-29 BX-6906) असा एकूण १,३३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी NDPS कायद्यानुसार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धीरज बांडे,उपोनि शरद लोहकरे सह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांनी अवैध धंद्यांविषयी निर्भयपणे माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


The slots here are absolutely addictive! I had a huge win last night and the withdrawal process was a breeze. Highly recommend ph18jili to everyone.