युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल, ची 100% निकालाची परंपरा कायम.
युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल, ची 100% निकालाची परंपरा कायम.
युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलचा मागील 18 वर्षापासून इयत्ता दहावी चा १००% टक्के निकाल लागण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवत विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक केला.अथर्व मनोज कदम यांनी ९७.४० गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले द्वितीय स्थान श्वेता ज्ञानेश्वर वानखेडे हिने ९६.४०% गुण प्राप्त केले तर मिसबा नैश खान हिने ९६% गुण घेऊन तृतीय स्थान पटकावले परीक्षेला एकूण ७५विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले तर ४० विद्यार्थ्यांनी ७५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले तर उर्वरित विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले .विशेष म्हणजे ७५विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत शाळेचे अध्यक्ष ऍड . संतोष जैन, उपाध्यक्ष कमलजी माहेश्वरी, सचिव भगवानजी अग्रवाल, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा फुलेवार, सौ. विजया ठाकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.