स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अंदाजे २५ लाखाचे साहित्य ढाणकी नगरपंचायत ला भेट.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अंदाजे २५ लाखाचे साहित्य ढाणकी नगरपंचायत ला भेट.
[नगर विकास मंत्रालयामार्फत घनकचरा व्यवस्थापनाकरिता भेट.]
ढाणकी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियान, सद्यस्थितीत संपूर्ण देशभरात यशस्वीतेच्या उच्च शिखरावर पोहोचल्याचे आपणास दिसत आहे.नगर विकास मंत्रालयामार्फत राबविल्या जाणारी योजना, स्वच्छ भारत अभियान नागरी घनकचरा व्यवस्थापन यामध्ये, नुकतीच नवीन झालेली ढाणकी नगरपंचायत चा समावेश करण्यात आला. या योजनेअंतर्गत ढाणकी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकरिता, दोन ट्रॅक्टर, दोन तीन चाकी अॅपे ऑटो, दहा डस्टबिन व हॅन्डग्लोज, मास्क, रेनकोट, होमथिएटर, बूट, प्रोजेक्टर इत्यादी किरकोळ साहित्य अंदाजे २५ लाख रुपये रकमेचे साहित्य ढाणकी न.पं.ला भेटले असून, आज ढाणकी शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या उपस्थितीत नवीन भेटलेल्या साहित्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मौला, नगरसेवक बाळू योगेवार, शेख इरफान, नगरसेविका बशनुरबी सय्यद खलील, स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब गंधेवार तसेच नितीन ठाकूर, रमेश गायकवाड, प्रकाश जयस्वाल,शेख मिरांजी यांसह ढाणकी नगरपंचायत चे कर्मचारी हजर होते.