नागपूर येथे गळफास घेऊन 27 वर्षे इसमाची आत्महत्या.

youtube

नागापूर येथे गळफास घेऊन एका २७ वर्षीय इसमाची आत्महत्या.

उमरखेड(प्रतिनिधी)

पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले नागापुर(प)गावात पिंटू सखाराम राठोड वय २७ नागापूर ता उमरखेड,याने घराचे बाजुला असलेल्या लिंबाचे झाडाला नॉयलोन दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची फिर्याद संतोष सखाराम राठोड रा .चुरमुरा ता.उमरखेड यांनी पोलीस स्टेशन पोफाळी
ला दिली .
दि ३१ जुलै रोजी सकाळी ५ ते ५.३० दरम्यान घटना घडली कारण आजाराला कंटाळून आत्महत्या केली त्यास लघवीचा त्रास होता,मागील दिड वर्षा पुरवी रोड अपघात झाला त्यांच्यावर उपचार करण्यात आला त्यांचे ऑपरेशन होवून लघवीचा त्रास होता पुन्हा ऑपरेशन करण्याचे डॉक्टरनी सला दिला.
पण आर्थिक परिस्थीती बरोबर नसल्यामुळे त्यास ऑपरेशन करणे शकय झाले नाही, त्यांनी दि ३१ जुलै रोजी सकाळी घराच्या जवळ लिंबाच्या झाडाला नायलोन दोरीने गळफास लिंबाच्या झाडाला घेतली आहे घरातील परिवार झोपले होते पत्नी शालुबाई ने उठून घराबाहेर पाहीले असता,लिंबाच्या झाडाला पिंटूने फाशी घेवून आत्महत्या केल्याचे दिसले.या घटनेची पोफाळी पोलीस स्टेशन ला नोंद केली असल्याचे आज दि 2 ऑगष्ट रोजी पोलीस सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.
पुढील तपास ठाणेदार कैलास भगत जमादार गणेश राठोड सुनित जाधव अमोल कान्हेकार करीत आहे.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!