शॉर्ट सर्किटमुळे फ्रिज रिपेरिंग सेंटरला आग 4 लाखांचे नुकसान

youtube

शॉर्ट सर्किटमुळे फ्रिज रिपेरिंग सेंटरला आग
4 लाखांचे नुकसान

उमरखेड : –
नांदेड रोडवरील फ्रिज रिपेरिंग सेंटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दि .8 डिसेंबरचे मध्यरात्री 2:30 वाजताचे सुमारास आग लागून या आगीत दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दुकानात ठेवलेले फ्रिज, वॉशींग मशीन , एसी , कॉम्प्रेसर मशीन इत्यादी उपकरणे आगीत भस्मसात झाल्याने दुकान मालक अब्दुल गफार जब्बारखान रा इदगाह नगर यांचे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले आहे.
येथील नांदेड रोडवरील हॉटेल व्ही डिलक्स च्या बाजूला अब्दुल गफार जब्बार खान रा. ईदगाह नगर यांच्या फ्रिज रिपेरिंग सेंटरला दि .8 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2:30 वाजता आग लागल्याची माहिती शेजारी राहणार्‍या व्यक्तीने फोनवरून दिल्यानंतर तेथे अब्दुल गफार हे दुकानावर पोहचले असता दुकानातील ग्राहकांनी तेथे दुरुस्तीसाठी ठेवलेले फ्रिज , वॉशींग मशीन, एसी , कॉम्प्रेसर मशीन अशी विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाल्याचे निदर्शनास आले . आगीचा भडका पाहुन नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाशी संपर्क साधला असता अग्नीशामक वाहन उपलब्ध झाले नसल्याचे आगग्रस्त दुकानदाराने सांगीतले . विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे .

” चौकट ”
दुकानाला लागलेल्या आगीत ग्राहकांनी दुरुस्तीसाठी ठेवलेली उपकरणे आगीत जळून भस्मसात झाल्याने ग्राहकांच्या लाखो रुपयांच्या उपकरणांची नुकसान भरपाई देण्यासाठी लाखो रुपयांच्या रकमेची जमवाजमव करण्याच्या विवंचनेत आगग्रस्त असतांना येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी आगग्रस्त दुकानाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली व आपत्तीग्रस्त अब्दुल गफार यांना यथाशक्ती आर्थिक मदत देऊन धीर दिला . यावेळी त्यांच्या सोबत सोनु खतीब , गोपाल अग्रवाल , बाबु हिना , शेख अझर , जुबेर कुरेशी आदिंची उपस्थिती होती .

Google Ad
Google Ad

1 thought on “शॉर्ट सर्किटमुळे फ्रिज रिपेरिंग सेंटरला आग 4 लाखांचे नुकसान

  1. My brother suggested I might like this website He was totally right This post actually made my day You cannt imagine just how much time I had spent for this information Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!