उमरखेड – महागाव विधानसभेतील शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा  आमदार ससानेंच्या प्रयत्नामुळे ४२ कोटी रुपयाची मदत. 

youtube

उमरखेड – महागाव विधानसभेतील शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा

आमदार ससानेंच्या प्रयत्नामुळे ४२ कोटी रुपयाची मदत

प्रतिनिधी
उमरखेड :

मागील जुलै महिन्यात उमरखेड व महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते . त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून सतत पाठवा करून या विभागाचे आमदार नामदेव ससाने यांनी शासनाकडून तब्बल ४२ कोटी रुपयाची मदत मिळवून दिली आहे .

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठी वित्तहानी झाली होती. अक्षरशः पिके खरडून गेली होती . त्यामध्ये तूर ,ज्वारी , हळद ,भाजीपाला आणि फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले होते याचबरोबर उमरखेड महागाव मध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते पूल हे सुद्धा क्षतिग्रस्त झाले होते .याबाबत विधानसभेचे आमदार ससाने यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा करून उमरखेड विधानसभेतील ६३ हजार ७२९ शेतकऱ्यांना जवळपास ४२ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली आहे . याबाबत तीन ऑक्टोंबर 2023 च्या महसूल व वनविभागाच्या जीआर नुसार ही रक्कम उपविभागीय अधिकारी यांना वर्ग करण्यात आली आहे .येत्या आठवडाभरात ही मदत स्वरूपातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आहे . ६३ हजार ७२९ शेतकऱ्यांमध्ये उमरखेड तालुक्यातील २० हजार ९४७ तर महागाव तालुक्यातील ४२ हजार ३५७ शेतकऱ्यांचा समावेश आहे . यामध्ये खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४२५ आहे . ४२कोटी रुपये मधून महागाव तालुक्यासाठी २५ कोटी ९ लाख २८ हजार रुपये तर उमरखेड तालुक्यासाठी १५ कोटी ९९ लाख ७० हजार प ५०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी २९लाख ६१ हजार रुपये देण्यात येणार आहेत . आमदार नामदेव ससाने यांनी शेतकऱ्यांच्या या नुकसानी सोबतच उमरखेड व महागाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते व पूल खराब झाली होती त्यांच्यासाठीही ४६२कोटी रुपयाचा डीपीआर शासनाकडून मंजूर करून घेतला आहे .आमदार ससाने यांना या सर्व विधानसभेतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्यानेच शासनाकडून ही मदत मिळाली असल्याचे आमदार ससाने यांनी सांगितले .

चौकट :
झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे व शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले होते याबाबत शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत करावी याकरिता शासन स्तरावर विभागाचे आमदार नामदेव ससाने यांनी पाठपुरावा केला . त्यामुळेच शासनाने भरीव मदत केली आहे .ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे .त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो .

नितीन भुतडा
भाजपा नेते उमरखेड

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!