गावंडे महाविद्यालयात “सन्मान चौथ्या स्तंभाचा” सोहळ्याचे आयोजन.

youtube

गावंडे महाविद्यालयात “सन्मान चौथ्या स्तंभाचा” सोहळ्याचे आयोजन

पत्रकारिता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर डॉ संजय खडक्कार करणार मार्गदर्शन

उमरखेड :- येथील गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन 28 एप्रिल रोजी करण्यात आले असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावती विभागाचे विभागीय संचालक तथा प्रसिद्ध स्तंभलेखक डॉ .संजय खडक्कार यांचे पत्रकारिता आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत असलेल्या गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय अभ्यास केंद्र 14 51 मध्ये असलेल्या जनसज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रमाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन 28 एप्रिल रोजी सकाळी म्युझियम हॉल गावंडे महाविद्यालय येथे करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी विभागीय संचालक तथा ज्येष्ठस्तंभ लेखक डॉ संजय खडक्कार उपस्थित राहणार असून नवीन लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून व्यंकट राठोड – उपविभागीय अधिकारी ,आनंद देऊळगावकर तहसीलदार, राम देवसरकर ,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज. डॉ.या.मा राऊत ,सचिव यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज हे उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेले आत्मदर्पण विशेषांकाचा विमोचन सोहळा ही या निमित्ताने पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी उमरखेड तालुक्यातील शिक्षक व शिक्षण प्रेमीनी तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य तथा केंद्रप्रमुख. डॉ. एम. बी. कदम यांनी केले आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!