जून्या घराचे सागवान व आडजात लाकडाची वाहतूक करताना वाहन पकडले दहा लाखाचा मुद्देमाल जप्त वन विभागाची कार्यवाही

youtube

जून्या घराचे सागवान व आडजात लाकडाची वाहतूक करताना वाहन पकडले

दहा लाखाचा मुद्देमाल जप्त

वन विभागाची कार्यवाही

उमरखेड :-
जुन्या घराचे सागवान व आडजात लकडी साहित्य वाहनात भरून वन विभागाची परवानगी न घेता इतरत्र ठिकाणी नेत असताना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. 11 रोजी सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान स्थानिक नांदेड रोडवरील एका शोरूम जवळ वाहन पकडले व वाहनासाहित 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाहतूकदाराविरुद्ध वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वडिलोपार्जित बांधकाम असलेल्या जुन्या माळवदाच्या घराचे सागवान व इतर आडजात लाकडांची दारे, खिडक्या व इतर साहित्यव इतर आडजात साहित्य वन विभागाची परवानगी न घेता आयशर क्रमांक एम एच 26 सीएच 28 68 या वाहनातून इतर ठिकाणी जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाल्यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तिथे पोहोचून सदर वाहन पकडले सदर मालाची वाहतूक करण्याचा परवाना न घेता संबंधित वाहतूकदाराने सागवान व इतर आडजात मालाची वाहतूक करीत असल्याचे वनक्षेत्र सहाय्यक एस एम हक व त्यांच्या सहकाऱ्यांना आढळून आले .सदर वाहनासहित अंदाजे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून वाहतुकदार सुभाष रामा बाभुळकर रा .भगतसिंग वार्ड उमरखेड याचे विरुद्ध वन अपराध क्रमांक 073 82 / 05 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .सदरची कारवाई पुसद विभागाचे उपवनसंरक्षक डॉ .बी एम स्वामी , उपविभागीय वन अधिकारी अमृत दगडे ,वनपरिक्षेत्र अधिकारी एस एस पांडे ,यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एस एम हक,वनरक्षक व्हि डी जायभाये ,पी .डब्ल्यू गायकवाड हे करीत आहेत .

Google Ad
Google Ad

3 thoughts on “जून्या घराचे सागवान व आडजात लाकडाची वाहतूक करताना वाहन पकडले दहा लाखाचा मुद्देमाल जप्त वन विभागाची कार्यवाही

  1. I do trust all the ideas youve presented in your post They are really convincing and will definitely work Nonetheless the posts are too short for newbies May just you please lengthen them a bit from next time Thank you for the post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!