स्वामी नामात दुमदुमली ढाणकी नागरीः
स्वामी नामात दुमदुमली ढाणकी नागरी
ढाणकी
ढाणकी शहरात साप्ताहिक श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र चालू करण्यात आले आहे. दि. १६ डिसेंबर २०२४ श्री दत्त जयंती व १७ डिसेंबर २०२४ श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र वर्धापन दिनाचे औचित्य साधून, केंद्राच्या वतीने श्री स्वामी समर्थ महराजांच्या पादुका , भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दत्त जयंती सप्ताह निमित्ताने ७ दिवस त्रिकाळ आरती करण्यात आली. विविध स्तोत्र मंत्र, पारायण असे कार्यक्रम करण्यात आले.
दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३९ वा श्री गुरुचरित्र ४ था अध्याय वाचन करून, शास्त्रोक्त पद्धतीने दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सत्यदत्त पूजन व केंद्राचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून, पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. पालखी सोहळ्या मध्ये शहरातील विविध स्थरावरून सेवेकर्यांचा उत्स्फुर्थ प्रतिसाद पाहण्यास मिळाला. श्री स्वामी समर्थांचे व दत्त नामात मिरवणूक मार्गाने पालखी निघाली. सहभागी सेवेकरी मध्ये एकच रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते व श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण हे पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अध्यात्माचे महत्व केंद्र निरीक्षक सौ.पूनमताई चव्हाण, केंद्र प्रमुख प्रशांत पंडितकर लोकांना पटउन देत होते. यासोबतचं प्रपंच सांभाळत परमार्थ साधण्याचे आवाहन केंद्र निरीक्षक सौ. पूनमताई चव्हाण यांनी जनतेला केले.
gab I do not even understand how I ended up here, but I assumed this publish used to be great
Hi my loved one I wish to say that this post is amazing nice written and include approximately all vital infos Id like to peer more posts like this
Wonderful web site Lots of useful info here Im sending it to a few friends ans additionally sharing in delicious And obviously thanks to your effort