उमरखेड शहरात प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात संपन्न; राम नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी

youtube

उमरखेड शहरात प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात संपन्न;

राम नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी

 

उमरखेड:
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त औदुंबर नगरीत ‘श्रीराम मित्र मंडळ’ आणि ‘सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती’च्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात भव्य स्वरूपात शोभायात्रा काढण्यातआली. जय श्रीरामाच्या घोषणांनी संपूर्ण शहर राममय झाले होते.
‘भारत का बच्चा बच्चा…’ वर तरुणाई थिरकली
सकाळी ठीक ११ वाजता साई मंदिरापासून श्रीराम मित्र मंडळाच्या शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण . रामभक्त हनुमान यांच्या वेशात व असोलाच्या वेशात तरुण थीरकत होते तर ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हनुमानाच्या वेशभूषेतील कलाकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बँडच्या तालावर आणि “भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा” या गाण्यावर शहरातील तरुणाईने ठेका धरला होता. ठिकठिकाणी या शोभायात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
तर दुसरीकडे
सार्वजनिक जन्मोत्सव समितीची नेत्रदीपक प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन वसंत नगर भागातून श्रीराम मंदीर स्टेट बॅके नगर भागातुन सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विविध पथकांनी आपली नेत्रदीपक युद्धकला आणि साहसी प्रात्यक्षिके सादर केली. हे कौशल्य पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती . हा संपूर्ण उत्सव अगदी शांततेत व भक्तीमय. वातावरणात पार पडला तर या संपुर्ण शोभा यात्रेदरम्यान उमरखेड पोलीसा कडुण तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

चौकट
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उमरखेड शहराचे सुशोभीकरण करण्यात आले होते. मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक, माहेश्वरी चौक गांधी चौक खडकपुरा चौकात रस्ते आणि घराघरांवर भगवे झेंडे व पताके लावण्यात आल्यामुळे संपूर्ण शहराला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. कडक उन्हाची तमा न बाळगता अबालवृद्धांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
दोन्ही मंडळांच्या वतीने आयोजित या उत्सवामुळे शहरात चैतन्याचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला.

सोबत : फोटो

Google Ad
Google Ad

7 thoughts on “उमरखेड शहरात प्रभू रामचंद्रांच्या जयघोषात शोभायात्रा उत्साहात संपन्न; राम नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी

  1. Boostaro is a modern mens wellness formula created to support daily vitality, stamina, and confidence through a practical, natural routine.

  2. PurDentix is a revolutionary oral health supplement designed to support strong teeth and healthy gums. It tackles a wide range of dental concerns, including gum inflammation and tooth decay

  3. NerveCalm is a high-quality nutritional supplement crafted to promote nerve wellness, ease chronic discomfort, and boost everyday vitality.

  4. 888slot poker là thương hiệu cá cược uy tín được cấp phép bởi PAGCOR. Sân chơi này nổi tiếng với sự minh bạch trong trả thưởng và bảo mật thông tin tuyệt đối cho người chơi tại Việt Nam. TONY04-08

  5. ProDentim is a modern oral-health supplement formulated with specialized probiotics and naturally sourced ingredients to help maintain firm teeth

  6. Sau gần 5 năm hoạt động, thương hiệu không chỉ có được vị thế vững chắc trên thị trường mà còn khẳng định đẳng cấp của mình khi sở hữu đầy đủ giấy chứng nhận hợp pháp từ PAGCOR và CEZA. 888slot. Do vậy, bạn hoàn toàn có thể yên tâm tham gia cá cược thỏa mãn đam mê của mình mà không cần lo ngại về những vấn đề pháp lý khác. TONY03-27O

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!