75 दात्याने केले रक्तदान एसबीआय येथे शिबिर संपन्न प्रतिनिधी-:

youtube

75 दात्याने केले रक्तदान एसबीआय येथे शिबिर संपन्न

प्रतिनिधी-:
एसबीआय यावर्षी आपला ७० वा स्थापना दिन साजरा करत आहे, या निमित्त, एसबीआयच्या वतीने संपूर्ण भारतातून ७०,००० रक्त युनिट्स गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ७० व्या स्थापना दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरात अनेक सार्वजनिक कल्याणकारी उपक्रम सुरू केले आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे सर्व राज्यांना व्यापून टाकणारी एक मेगा रक्तदान मोहीम.
उमरखेड जि. यवतमाळ एसबीआयच्या स्थानिक कार्यालयात बुधवारी एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग होता. सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी उमरखेड शाखेचे उपव्यवस्थापक केदार कोंडे यांनी रक्तदान करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सदर शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले दायित्व पार पाडले.
स्टेट बँक इंडिया उमरखेडचे शाखा व्यवस्थापक प्रदीप फटिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाला भाजप चे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ब्लड बँकचे संचालक बालाजी चिंचोलकर,जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.या प्रसंगी बोलताना फटिंग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढे येऊन या उदात्त कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले. “रक्तदान हे जीवनदायी कृत्य आहे आणि ते एसबीआयने जपलेल्या सेवा आणि मानवतेच्या मूळ मूल्यांचे प्रतिबिंब आहे,” असे ते म्हणाले.
या शिबिरात स्थानिक कार्यालयातील इतर अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला,

Google Ad
Google Ad

2 thoughts on “75 दात्याने केले रक्तदान एसबीआय येथे शिबिर संपन्न प्रतिनिधी-:

  1. **mitolyn**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!