प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

youtube

प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

उमरखेड:- दि २६:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन उमरखेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. तहसिल कार्यलयाच्या पटांगणात आयोजित मुख्य कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड , यांनी ध्वजारोहण केले. या नंतर पोलिस निरीक्षक पांचाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने उपविभागीय अधिकारी यांना मानवंदना दिली. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकिय सोहळ्याला आमदार नामदेवराव ससाने , उमरखेड तहसीलदार डॉ आनंद देऊळगावकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी महेश जामनोर, उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी , गटविकास अधिकारी प्रविण वानखडे ,नायब तहसीलदार एम डी नकितवाड, नायब तहसीलदार एस. डी. पाईकराव ,नायब तहसीलदार व्ही. व्ही. पवार , नायब तहसीलदार आर एम पंधरे ,स्वंतत्र संग्राम सैनिक न.प. सदस्य प्रतिष्ठीत नागरिक , पत्रकार, तलाठी, तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालय उमरखेड यांचे तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन विभागाचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांचे हस्ते व उपविभागीय अधिकारी डॉ वेंकट राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीपजी पाडवी साहेब तहसीलदार डॉ आनंद देऊळगावकर , पोलीस निरिक्षक पांचाळ मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्या उपस्थितीत आज उमरखेड येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.यावेळी सर्वच शाळेच्या विध्यार्थ्यांना आपल्या कलागुणाचे जल्लोषात सादरीकरण केले.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!