पोलीस बाँईज असोसिएशन यवतमाळ विदर्भ सविता चंद्रे यांच्या वतिने कोरोना युध्दा सन्मान पत्र प्रदान.
पोलीस बाँईज असोसिएशन यवतमाळ विदर्भ महिला अध्यक्षा पत्रकार सवीता चंद्रे यांच्या वतीने कोवीड १९ मध्ये कार्य केलेल्या पोलीस व दानशुराचा गौरव सन्मान
उमरखेड ता. प्रतिनिधी पोलीस बाँईज महाराष्ट्र राज्य
उमरखेड..
ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ च्या वतीने ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ कडून मंगळवार तेरा रोजी पोलिस स्टेशन उमरखेड येथे पोलीस बाँईज असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष रवि भाऊ वैद्य राज्य सरचिटणीस विकास सुसर महीला प्रदेशअध्यक्षा विजयाताई बावदणे यांच्या संमत्तीने विदर्भ महिला अध्यक्षा पत्रकार सवीता चंद्रे यांनी कोवीड १९ आपत्ती मध्ये पोलिस प्रशासन, आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती सह विविध स्तरांवर केलेल्या सामाजिक बांधिलकी चा सन्मान व्हावा यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून उमरखेड जिल्हा यवतमाळ पोलिस स्टेशनचे उप निरीक्षक बोडखे साहेब यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुणे psi पांचाळ साहेब, apiखेडकर साहेब, api गाडे साहेब, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ गांजेगावकर, सामाजिक कार्यकर्त्या देशमुख मडम, यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना सन्मान पत्र देऊन गौरव केला.
यामध्ये पोलिस निरीक्षक मोतीराम बोडखे, पोलिस निरीक्षक खेडेकर, पोलिस निरीक्षक गाडे, पोलिस निरीक्षक पांचाळ, पोलिस निरीक्षक लता पगलवाड, पोलिस कर्मचारी सुलोचना राठोड, आदेश विजय कुमार जेन सामाजिक कार्यकर्त्या माधुरी दळवी, जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था, राजस्थानी भवन मंडळ उमरखेड यांचा पोलिस बाईज संघटनेच्या वतीने कोरोना युध्दा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी पोलीस स्टेशन ठाणेदार बोडखे स्टेशनचे कर्मचारी
सर्व अधिकारी , व्यंकटेश पेन्शनवार, नंदनवार, अशोक गांजेगावकर,अजहर उल्ला खान व दानशुराच्या उपस्थित होते. सुत्रसंचलन पोलिस बिट जमादार संतोष चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार तथा आयोजक सवीता चंद्रे यांनी केले.