आर्य वैश्य समाजाच्याळ विस्तारित बांधकामाचा लोकार्पण सोहळा.ह

youtube

*उमरखेड आर्य वैश्य समाजाच्या विस्तारित बांधकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न*

उमरखेड..
येथील आर्य वैश्य समाजाच्या विस्तारित बांधकामाचा लोकार्पण सोहळा समाजाचे अध्यक्ष इंजिनीयर सुरेंद्र कोडगीरवार यांच्या हस्ते वासवी मातेचे पूजन करून अतिशय थाटात व मोजक्याच समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला नवीन बांधकाम हे अतिशय सुसज्ज असून संपूर्ण वातानुकूलित आहे यामध्ये 4 रूम असून दोन मोठे हॉल व एक मॅरेज हॉल बांधण्यात आला असून मंत्र विधी करून समाज बांधवांच्या व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आर्य वैश्य समाज उमरखेड ची स्थापना 1970 साली करण्यात आली.
या नवीन विस्तारित बांधकामासाठी देणगी स्वरूपात उमरखेड आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष इंजिनियर श्री सुरेंद्र कोडगीरवार यांनी अकरा लाख रुपये देणगी दिली तसेच बांधकाम व्यावसायिक विवेक मामीडवार यांनी दोन लाख 51 हजार रुपये व उत्तम पत्तेवार यांनी दोन लाख 51 हजार रुपये तर बांधकाम व्यावसायिक चंद्रशेखर कोकडवार यांनी 2 लाख 51 हजार रुपये देणगी दिली उमरखेड आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगीरवार साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमने ही एक नवीन वास्तू अतिशय सुसज्ज व चांगली केल्याबद्दल त्यांचे उमरखेड येथील समाज बांधवांनी व मित्र परिवारांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्याला आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगीरवार, उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मामीडवार, सचिव गजानन कोडगीरवार, सहसचिव किरण मुक्कावार तर कोषाध्यक्ष सचिन निलपवार यांच्यासह समाजातील अनेक बांधव व मित्र परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!