उमरखेड नगर परिषदेची विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध.

youtube
  1. उमरखेड नगर परिषदेची विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

उमरखेड

येथील नगर परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक आज 13 जानेवारी रोजी नगर परिषद सभागृहात पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी काम पाहिले
विषय समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे आज 13 जानेवारी रोजी विषय समिती सभापती पदाची निवडणूक पार पडली यावेळी पीठासीन अधिकारी स्वप्नील कापडणीस यांचे सूचनेवरून सकाळी अकरा वाजता पासून नामांकन दाखल करणे सुरू झाले होते यावेळी सत्ताधारी शहर विकास आघाडी वगळता विरोधकांनी नामांकन दाखल न केल्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध पार पडली आहे सताधारी गटाची युती असलेल्या शहरविकास आघाडीच्या वतिने बांधकाम सभापती म्हणून भाजपाचे बाळासाहेब नाईक यांची निवड झाली असून स्वछता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य सभापती पदी अपक्ष निवडून आलेले नगरसेवक अमोल तिवरंगकर तर पाणी पुरवठा व जलणीस्सारण सभापती पदी भाजपाचे दिलीप सुरते तसेच शिक्षण सभापती पदी भाजपचे प्रकाश दुधेवार यांची बिनविरोध निवड झाली असून महिला व बालकल्याण सभापती पदी भाजपच्या अनुप्रीता देव यांची तर विद्यमान उपाध्यक्ष असलेले अरविंद भोयर यांची नियोजन व विकास सभापती पदी बिनविरोध निवड झाली आहे तर स्थायी समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल आणि स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा तसेच एम आय एम चे गटनेते तथा विरोधी पक्षनेते जलील कुरेशी यांची वर्णी लागली आहे भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष नामदेव ससाणे वगळता एम आय एम चे आठ सताधारी भाजपाचे सात शिवसेनेचे चार तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तीन राष्ट्रवादी काँग्रेस एक तर अपक्ष एक नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे विरोधी गटाने नामांकन दाखल न केल्यामुळे सताधारी गटाची निवड बिनविरोध झाली असून आजच्या निवडीमध्ये फक्त एकाच महिलेला स्थान मिळाले आहे

उपाध्यक्षच गैरहजर

  1. विषय समिती सभापती निवड प्रक्रियेच्या दुपारच्या सत्रात शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे नगर परिषद उपाध्यक्ष तथा आज निवड झालेल्या नियोजन समिती सभापती अरविंद भोयर अनुपस्थित राहिल्याने शिवसेनेची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर आली
Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!