कळमुला येथे सरपंच पदी प्रणिता बचने तर उपसरपंच अनंता कनवाळे.
कळमूला येथे सरपंचपदी सौ.प्रणिता बचने तर उपसरपंच पदी श्री.अनंता कनवाळे.
पोफाळी भागवत काळे.
उमरखेड तालुक्यातील कळमूला ग्रामपंचायतीत आज दिनांक २२ फेब्रुवारी २१ रोजी झालेल्या सरपंच व उपसरपंच पदांसाठी बिनविरोध निवड झाली. सरपंच पदी सौ. प्रणिता रामदास बचने तर उपसरपंच पदी श्री अनंतराव दत्तराव कनवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत
निवडणुकीत ७ जागांपैकी ग्राम विकास पॅनलला ५ जागा मिळाल्या आहेत. तर प्रतिस्पर्धी पॅनला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेत सरपंचपदासाठी एकमेव उमेदवार सौ. प्रणिता बचने तर उपसरपंचपदासाठी एकमेव श्री अनंतराव कनवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अध्यासी अधिकारी एस.पि.मुन मंडळ अधिकारी यांनी सरपंचपदी प्रणिता बचने तर उपसरपंचपदी अनंता कनवाळे हे बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेस सदस्य मंगल कनवाळे, शंकर काळ, स्वाती कनवाळे, रंजना शिंदे व टोपाजी हुपाडे हे सातही सदस्य उपस्थित होते.निवडणुक कामकाजास कर्मचारी बालासाहेब कनवाळे यांनी सहाय्य केले.निवडीनंतर गुलाललाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.