गाव तिथे अधिकारी हे स्वप्न पाहणारे रामभाऊ देवसरकर यांचा मी पाहिलेला एक क्षण व अनुभव
गाव तिथे अधिकारी हे स्वप्न पाहणारे रामभाऊ देवसरकर सभापती यांचा मी पाहिलेला एक क्षण व अनुभव..सविता चंद्रे
उमरखेड ….सविता चंद्रे
पोफाळी येथे मी गेले असता तिथे गावातील खेड्या गावातील मुला व मुलींकरिता एक नवा उपक्रम अभ्यासिका चा राम देवसरकर अध्यक्ष यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद यवतमाळ भाऊंनी तिथे उपलब्ध करून दिला व तो अभ्यासिका पाहून मला असे जाणवले कारण मी पण 2016 पर्यंत पूर्ण शिक्षण घेतले आणि अभ्यासिका ह्या शहरी भागातच उपलब्ध असतात पण ग्रामीण भागांमध्ये अभ्यासिका पन उपलब्ध करून देत आहे पाहून आश्चर्य झालं कारण खेडेगावातला युवक हा आपल्या गावचा अधिकारी झाला पाहिजे असे या राम भाऊ च्या संकल्पनेतून मला दिसले व विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत छान सोय त्यांनी निर्माण करून दिली आणि खरंच आजचा सर्वात महत्त्वाचा व गंभीर प्रश्न म्हणजे आज नोकऱ्या ह्या खूप कमी लोकांना मिळत आहे तसेच वाढती महागाई बेकारी आणि बाहेर जाण्याच्या मध्ये आपला पैसा खर्च करणे तिथे आपला अभ्यास करणे यामध्ये वेळ न घालता राम भाऊ देवसरकर यांनी आपल्या खेड या गावात अभ्यासिका उपलब्ध करून सगळा वेळ वाचून विद्यार्थ्यांचा त्यांना तिथे अनमोल असं वाचन करून व लिखाण करून त्यांना आपल्या स्वतःच्या पायावर सक्षम होण्याचा मार्ग रामभाऊ देवसरकर यांनी दिले. खेडेगावांमध्ये उपक्रम हा नावीन्यपूर्ण आहे. खेडेगावांमध्ये आपला गावातील मुलगा हा आपल्या गावची आन-बान शान व एक चांगला अधिकारी म्हणून आपल्या समाजात हा दिसयला पाहिजे व आपल्या गावाचा किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारा अधिकारी आपल्या खेड्या गावात घडला पाहिजे अशी ही संकल्पना खरंच अत्यंत छान दिसली.कारण मी प्रत्यक्ष एक महिला पत्रकार असून मला ह्या गोष्टी जाणवल्या की खरंच ही संकल्पना कोणीही करू शकत नाही गाव तेथे अधिकारी घडावा आणि त्या माध्यमातून एक नवयुवक पिढीला एक चांगली चालना मिळावी आणि त्या अभ्यासातून आपल्या व्यक्ती गुणांचा विकास हा लेखणीतून उतरून आपल्या जीवनाचा एक आधारशिला स्तंभ स्वतः विद्यार्थी हा घडू शकतो असे रामभाऊ देवसकर यांचे विचार आहेत आणि स्वतःच्या कधी विचार न करता युवापिढीचा विचार करत आहे ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे हे मी माझ्या लेखणीतून मांडले आहे.
तरूण पिढि साठी कर्तृत्वान आणि प्रत्यक्ष कामातुन दिशा देणारे रामभाऊ देवसरकर .
सविता चंद्रे पत्रकार नारिशक्ती