महा विकास आघाडी तर्फे वाढत्या महागाई विरोधात पंतप्रधानांना निवेदन.
महाविकास आघाडी तर्फे वाढत्या महागाई विरोधात: पंतप्रधानांना निवेदन.
ढाणकी प्रतिनिधी –
आधीच कोरोना मुळे डबघाईस आलेले व्यवसाय आणि त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई या मुळे सामान्य जनता त्रस्त झाली असून यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नियंत्रण आणून महागाई कमी करावी यासाठी ढाणकी नगरपंचायत महाविकास आघाडी तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्याधिकारी ढाणकी नगरपंचायत मार्फत निवेदन देण्यात आले.
दर दिवसाला महागाई उचांक गाठत असून जिवनावश्यकवस्तू चे भाव सुद्धा गगनाला भिडले आहेत. पेट्रोल शंभरी पार गेले असून यामुळे सामान्य माणसाचा खिसा खाली झाला आहे. गॅस सिलेंडर भरणे सुद्धा गरिबांना परवडणे मुश्किल झाले आहेत. यात भर म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालयाने खताचे सुद्धा भाव वाढवल्याने शेतकरी राजा वर आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एकंदरीत वाढत्या महागाई ने देशातील जनता कंटाळली असून यावर कुठे तरी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
या सर्वसामान्य जनतेचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी ढाणकी नगरपंचायत महाविकास आघाडी ने मुख्याधिकारी मार्फत पंतप्रधान कार्यालयाला निवेदन सादर केले असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जर महागाई कमी नाही झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन सादर करते वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे ढाणकी शहर अध्यक्ष अमोल तुपेकर, शिवसेना ढाणकी शहर प्रमुख विजय उर्फ बंटी जाधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, राष्ट्रवादी काँग्रेस ढाणकी शहर अध्यक्ष विजय वैद्य, नगरसेवक संबोधी गायकवाड, गजानन आजेगावकर, स्वप्निल पराते, प्रवीण जैन उपस्थित होते.