सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त वृक्षारोपण राबविण्याची संकल्पना.
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त महाराष्ट्रात वृक्षारोपण राबविण्याची संकल्पना
अहमदनगर
जिल्हा प्रतिनिधी
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना आव्हान करण्यात येते कि आपल्या गावात एक ग्रामपंचायत, एक सरपंच आणि १०० झाड ही खास संकल्पना जर राबवली जावी या योजनेची सविस्तर मिटींग आज सरपंच सेवा संघाचे राज्यातील पदाधिकारी यांच्या सोबत झोम अॅप वर ऑनलाईन घेण्यात आली या वेळी सह्याद्री गेवराई चे अध्यक्ष वृक्षसंवर्धनाजी सिने अभिनेते मा.सयाजी शिंदे. सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस मा.बाबासाहेब यादवराव पावसे , आदर्श सरपंच
सचिन राऊत अमरावती मा नारायण पोवार कोल्हापूर रामदास शिंदे जिल्हा समन्वयक अहमदनगर लोकनियुक्त सरपंच संदिप शेलार जिल्हाध्यक्ष सरपंच सेवा संघ, रविंद्र पावसे राज्य निरीक्षक सोशल मीडिया प्रमुख रोहीत पवार सरपंच सेवा संघ आदी मान्यवर उपस्थित होते.
वृक्षांबद्दल प्रेम कसं जागृत झालं?
माणसाला पहिलं आईबद्दल प्रेम वाटतं.
जगात आपल्याला आईच्या उदरानंतर ऑक्सिजन सेफ वाटतो. त्यामुळे धरती माता ही दुसरी आई आहे. तिथून झाड जगवलं पाहिजे हे मनात रुजलं. हा आपला आनंदाचा भाग आहे. झाडांसाठी काम करणारी माणसंही निस्वार्थी आहेत. त्यांच्यासोबत काम करायला खूप आनंद वाटतो.
१५ ऑगस्टसाठी वृक्षसंवर्धनासाठी खास संकल्प
एक गाव एक सरपंच आणि १५० झाडं ही खास संकल्पना १५ ऑगस्टला साकारणार आहोत. एकाच दिवसांत झाडांचं दिड शतक करण्याचा उपक्रम १५ ऑगस्टला राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचं झाडं लावून त्यांचं संवर्धन करण्याचं आवाहन सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं संयाजी शिंदे यांनी आवाहन केलं आहे.
आपली झाडं, आपणच आणायची, आपणच लावायची आणि आपणच जगवायची, मैदानातच उतरयाचं पण दिड शतक झालंच पाहिजे असं आवाहनही सरपंच सेवा संघाचे संस्थापक राज्य सरचिटणीस मा.बाबासाहेब यादवराव पावसे पाटील यांनी यांनी केलं आहे. येत्या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहे, या निमित्ताने आपल्या गावात झाडांचं दिड शतक पूर्ण झालं, तर झाडांचं वाढदिवस आणि झाडं लावणाऱ्यांचा जाहीर सत्कार सरपंच सेवा संघा तर्फे करण्यात येणार.