उमरखेड शहरासह तालुक्यात प्लास्टिक पन्नीचा सारस वापर.

youtube

उमरखेड शहरासह तालुक्यात प्लाष्टीक पंन्नीचा सर्रास वापर

प्लाष्टीक बंदीचा कायदा वाऱ्यावर

नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत

प्लाष्टीकमुक्त भारताचा नारा फसवा

*सविता चंद्रे*

उमरखेड(प्रतिनिधी)
दि.20_जुलै

राज्य सरकारने २३ जून २०१८ पासून महाराष्ट्रात प्लाष्टीक बंदी केली,ही कारवाई पहिले एक,दोन,तीन महिने खूब चांगल्या रीतीने प्रामाणिकपणे केली,मात्र उमरखेड शहर तसेच तालुक्यात प्लाष्टीकचा वापर खुलेआम होतांना दिसून येत आहे.
उमरखेड नगर नगरपरिषद अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.यातून प्रशासनावर शासनाचे कोणतेच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे,अद्यादेश काढायचे,कारवाईचे नाटक करायचे नंतर प्रशासन काय करते याकडे दुर्लक्ष करायचे नेमके हेच एकंदरीत चित्र दिसत आहे.
यावरून प्रदूषण विरहित व प्लाष्टीकमुक्त भारत यासाठी उमरखेड तालुक्याचे प्रशासन किती गंभीर आहे.हे दिसून येत आहे.
राज्य सरकारने २३ जून २०१८ पासून लागू केलेल्या प्लाष्टीक बंदीला तीन वर्षे झाले असले तरी आता कारवाई मात्र थंडावली आहे.त्यामुळे आता प्लाष्टीक कॅरीबॅग,थर्माकोल पत्रावळ्या,भाजी व किराणा साहित्यसाठीच्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या बाजारात सर्रास मिळत असतांना दिसून येत आहे.
नागरिकांना घरून कापडी पिशवी घेऊन जाऊन किराणा भाजी व अन्य साहित्य आणण्याची सवयही नसल्याने सगळीकडे प्लाष्टीक पिशव्यातूनच साहित्य आणण्याची पद्धत सुरूच आहे,याच पिशव्यांच्या माध्यमातून मग कचरा भरून तो कचरा-कुंड्यातून फेकून देण्याचे प्रकार घडत आहे.प्लाष्टीकची बंदी आली तेव्हा नगर परिषद ने फक्त एक, दोन, तीन,महिनाच कारवाई जोरात केली. काही महिन्यानंतर कारवाई मात्र थंडावली,,तरीही प्लाष्टीक बंदीच्या मोहिमेकडे दुर्लक्ष झाले,तरी प्लाष्टीक विक्री व वापर कमी झालेला नाही,संपूर्ण राज्यात शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लाष्टीक कॅरीबॅग विकण्यास सक्त बंदी आहे,मात्र उमरखेड शहरासह तालुक्यात सर्वत्र खुलेआम प्लाष्टीकचा सर्रास वापर केला जात आहे.
दुकानदार व्यापाऱ्यांशी अधिकारी कर्मचाऱ्यांचे “सॅटेलमेंट” झाल्याचा आरोप केला जात आहे,प्लाष्टीकची बंदी केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.वजनाने हलक्या असल्याने प्लाष्टीक पिशव्या हवेबरोबर वाहत जाऊन पाणीसाठया मार्फत जंगल आणि जमिनीवर साचतात,मोकाट जनावरे जलचर प्राणी अन्न समजून या प्लाष्टीक पिशव्या गिळतात, आतड्यात प्लाष्टीक साचल्याने जनावरांचा मृत्यू होतो.
पावसाळ्यात प्लाष्टीक पिशव्यांमुळे गटारे कोंबून पाणी साचते त्यामुळे डासांची निर्मिती होते,
मागील अनेक महिन्यापासून प्लाष्टीक व पथकाच्या कारवाया थंडावल्या आहेत,त्यावरून या पथकाचे दुकानदार व्यापाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे,दरम्यान उमरखेड नगरपरिषद,ग्रामपंचायत,पंचायत समिती,पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचा कारभारही मागील काही दिवसांपासून बिघडला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे,

( बातमी वर हे खालील 3 कॉलम बॉक्स घेणे )
व सोबत फोटो लावणे.

( …..उमरखेड शहर तसेच तालुक्यात दुकान,हॉटेल,हातगाड्यांवर तर प्लाष्टीकचा वापर होतच आहे,शिवाय कारवाई करणाऱ्या नगरपरिषद,ग्रामपंचायत, अधिकारी,कर्मचारी,सर्रासपणे प्लाष्टीक पिशव्यांचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे,याकडे शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे,)

(…..गल्लीबोळातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळणाऱ्या प्लाष्टीक पिशव्यांचा प्रमाणावर प्लाष्टीक बंदी कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी येत आहेत,कायद्याचे भय नसलेले फेरीवाले,हातगाड्या आणि दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लाष्टीक पिशव्यांचा वापर केला जात असल्याचे आढळून येते,त्यामुळे उमरखेड शहरांमध्ये प्लाष्टीकच्या प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे,………

(……नगरपरिषद कडून प्लाष्टीक बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही,घंटागाड्यामध्ये प्लाष्टीक स्वतंत्रपणे गोळा करण्याची यंत्रनाही नाही,अशा स्थितीत किमान प्लाष्टीक वापर टाळण्याबाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याचा पर्याय असतांना,त्याहीबाबत उमरखेड शहर तसेच तालुक्यात प्लास्टिक बंदीची ऐशितैशी वर्षभरानंतरही कायम आहे,प्लाष्टीक बंदी अंमलबजानीसाठी नगरपरिषद ची स्वतंत्र यंत्रणा आहे, पिशव्यांच्या वापरावर कायद्याने बंदी असूनही शहरामध्ये त्याचा सर्रास वापर केला जात आहे,ही एक चिंतेची बाब आहे…..

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!