सत्य साई सेवा समिती उमरखेड कडुन वृक्षारोपण.

सत्य साई सेवा समिती उमरखेड तर्फे वृक्षारोपण
उमरखेड(प्रतिनिधी)सविता चंद्रे
दि.20_जुलै.
दि.14 जुलै रोजी सकाळी 10 वा सत्य साई सेवा समिती उमरखेड तर्फे, आषाढी एकादशी सप्ताहानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वामी समर्थ मंदिर केंद्र उमरखेड येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.सोबतच कोविड काळात गरीब गरजूं व्यक्तींना अन्नदान, किराणा किटचे वाटप करण्यात आले.
तसेच नारायण सेवा तर्फे फळाचे वाटप तसेच कपडे वाटप करण्यात आले. दरवर्षी स्वामी समर्थ मंदिर येथे अध्यात्मिक कार्यक्रम केले जातात.
ह्या उपक्रमामध्ये सत्यसाई समिती उमरखेड व साई सेवक,दळवी सर, पेंढारकर सर, चव्हाण सर, किशोर वडके सर, वानखडे सर, गोपाल चंद्रवंशी, सुरेश उगे सर, काळकर सर, गणेश कोटगिरे, चैतन्य उगे, अथर्व चंद्रवंशी, कु.कल्याणी उगे व महिला, यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.