महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीचा हस्तक्षेप कधी थांबणार.

youtube

महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीचा हस्तक्षेप कधी थांबणार

मुळावा ग्रामपंचायत सदस्यांचे पतीच चालवतात कारभार

प्रतिनिधी मुळावा :-

ग्रामपंचाय च्या महिला सदस्यांच्या कारभारात त्यांचे पतीच सर्रासपणे लुडबुड व हस्तक्षेप करताना दिसतात पण यापुढे महिला सदस्यांच्या कामात त्यांच्या पतीचा किंवा इतर नातेवाईकांचा हस्तक्षेप चालणार नाही, शिवाय संबंधित पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या नातेवाईकांना बसताही येणार नाही असा आदेश राज्य सरकारने दिला आहे,
अशा प्रकारचा आदेश संबंधीत सर्व ग्रामपंचायत ला प्राप्त असूनही मुळावा येथील महिला सदस्यांचे पतीचा राजकारभार मात्र काही केल्या कमी होताना दिसून येत नाही,
या बाबत सविस्तर वृत्त असे की मुळावा येथील आठवडी बाजार च्या कर वसुली व साफसफाईचे काम निविदा भरून घेतलेल्या ठेकेदारास एका महिला सदस्यांचे पती दमदाटी करून काम व्यवस्थित करण्याचे फर्मान काढत असल्याचे निदर्शनास आले आहे, संबंधित ठेकेदारास आठवडी बाजारात कर वसुली करून आठवडी बाजार साफसफाई चे काम निविदेमार्फत देण्यात आले आहे व आठवड्यातून एक वेळ साफसफाई करण्याचे नियम आहे सदर ठेकेदाराने बाजार भरण्यापूर्वी साफसफाई करावी अशा सूचना ठेकेदारास दिल्या होत्या त्या प्रमाणे काम सुरू होते परंतु येथील एका महिला सदस्यांच्या पतीने ठेकेदारास बाजाराच्या दुसऱ्या दिवशी सफाई का करत नाही म्हणून जाब विचारला या वरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला तरी याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास भविष्यात मुळावा येथील महिला सदस्यांचे पती यांची दबंगशाही कशी थांबणार अशी चर्चा सध्या मुळावा गावात आहे , सदर महिला पतीचा हस्तक्षेप न थांबल्यास मुळावा गावाच्या विकासात खूप मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, या बाबत प्रशासन काय कारवाई करते हे येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!