सेतु मधील दलालांंचा बदोबस्त करा- एमपिजे संघटनाने निवेदन तहशिलदार यांना दिलेचे
सेतु मधील दलालांचा बंदोबस्त करा
सेतु मध्ये नागरीकांची आर्थिक लुट, कामात विलंब थांबवा.
*एमपीजे संघटनेचे तहसीलदारांना निवेदन*
प्रतिनिधी
उमरखेड : तहसील कार्यालया मधील दलाल कर्मचाऱ्याशी साटेलोटे करित नागरिकांनकडून अवाढव्य पैसे उकळत आहेत. म्हणून कर्मचाऱ्यासोबतच दलालांचा पण बंदोबस्त करावा अशी मागणी मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्डजस्टीस या अन्नसुरक्षे संबंधी कार्य करणाऱ्या संघटने तर्फे तहसीलदारांना करण्यात आली .
निवेदनात नविन शिधा देणे, शिधापत्रीकेत नाव वाढविणे,व कमी करणे, , शिधापत्रीकेत एकक वाढविणे,हरविलेल्या शिधापत्रीके ऐवजी दुय्यम शिधापत्रिका देणे, फाटलेल्या -खराब झालेल्या शिधापत्रिकेऐवजी दुय्यम पत्रिका देणे, शिधापत्रिक रद्द करून तसे प्रमाणपत्र देणे, रूग्णांना दवाखान्याचे प्रमाणपत्र देणे,नवीन डाटाइंन्ट्री करणे, तसेच जुन्या डाटा इन्ट्रीमध्ये नाव समाविष्ट करणे व कमी करणे, आदि विविध कामे तहसील कार्यालयामार्फत होत होती .
ही कामे तहसील कार्यालयाने सेतुला दिलेली आहेत परंतु सेतु व्यवस्थापक वरील विभिन्न कामाचे शासनाने निश्चित केलेल्या फी नुसार दर न घेता अवाढव्य शुल्क – कोणतीही पावती न देता वसुल करत आहेत तसेच कामाच्या काल मर्यादेपेक्षा जास्त वेळ घेवून आठवडा आठवडा – महीना महीना विलंब करत आहेत . यामुळे नागरीकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत . असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली की,खाजगी सेतुचे विविध कामाचे शासकीय दरानुसार फी घेण्यासाठी त्यांना सक्त ताकीद करावी-तसे फलक सेतु वर लावण्यात यावे . -शासकीय परिपत्रकानुसार शिधा संबंधी विविध कामाच्या कालमर्यादा चे वेळ फलक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करावे .-सेतु संबधी तक्रारीसाठी फलकावर तक्रार निवारण अधिकाऱ्याचा फोन नंबर नमुद करण्यात यावा,-तसेच दलालांचा बंदोस्त करावा .अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .
नागरिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा पण देण्यात आला .
निवेदन देतांना गजानन भालेराव, मोहसीन राज, अ . जहीर, मुख्तार शहा, समीर मुस्तफा, सिद्धार्थ दिवेकर,मिनाज अहेमद, तौकीक राज, सिराज खान, प्रकाश चव्हाण, जरीब खान आदी कार्यकर्ते उपस्थित
होते .